रेल्वे स्थानकावर २० मिनिटे आधी पोहोचा नाहीतर...

    06-Jan-2019
Total Views | 28

 

 
 
 
 
 
नवी दिल्ली : विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे स्थानकावरही सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने योग्य पावले उचलत रेल्वेने योजना आखली आहे. या योजनेनुसार रेल्वे प्रवाशांना गाडी सुटण्याच्या वेळेअगोदर १५ ते २० मिनिटे लवकर रेल्वे स्थानकावर यावे लागणार आहे. प्रवाशांनी सुरक्षेचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी उशीर झाल्यास गाडी सोडण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे.
 

कुंभ मेळ्याच्या तयारीसाठी प्रयागराज रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे. कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारची कडक सुरक्षा व्यवस्था आहे. देशातील २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा यंत्रणा बसविण्याची रेल्वेने तयारी सुरु केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.

 

रेल्वे स्थानक सर्वबाजूंनी सुरक्षित करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवताना रेल्वे स्थानाकाला एकूण किती प्रवेशद्वारे आहेत. तसेच गरजेच्या वेळी त्यातील किती प्रवेशद्वारे बंद करता येतील. या सगळ्याचा अभ्यास केला जाणार आहे. रेल्वे स्थानकातील अनावश्यक आणि खुले मार्ग भिंत उभारून कायमचे बंद करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अन्य प्रवेशद्वारांवर सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील. अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.

 

या २०२ रेल्वे स्थानकांवर त्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणीचे टप्पे असतील. सुरक्षा तपासणीचे हे सर्व टप्पे पार केल्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात आत प्रवेश दिला जाईल. यामुळे विमानतळावर जसे प्रवासी सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी वेळेआधी विमानतळावर पोहोचतात. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावरही आता प्रवाशांना वेळेआधी पोहोचावे लागणार आहे. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी रेल्वे प्रवाशांनी सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे स्थानकावर किमान १५ ते २० मिनिटे आधी पोहोचणे अपेक्षित आहे. अन्यथा गाडी सोडण्याची वेळ प्रवाशांवर येईल.

 

रेल्वे स्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्क्रिनिंग, बॉम्ब शोधक आणि वाशक यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा समावेश या इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टममध्ये असणार आहे. इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टमची यंत्रणा ही रेल्वे स्थानकांच्या प्रवेश द्वारांवर असणार आहे. रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा अशाप्रकारे वाढविण्यासाठी अशी यंत्रणा उभारण्यासाठी ३८५.०६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीमध्ये रिअल टाइम सॉफ्टवेअरचाही वापर करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरद्वारे प्रवाशांच्या चेहऱ्याची ओळख पटवली जाईल. या तपासणी दरम्यान एखादा गुन्हेगार आढळून आल्यास सुरक्षा यंत्रणा लगेच अलर्ट होतील. ही माहिती अरुण कुमार यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करणार :भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी दिली माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करणार :भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी दिली माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख आ.प्रविण दरेकर यांनी दि.२९ जून रोजी दिली...

अभिराम भडकमकर यांच्या

अभिराम भडकमकर यांच्या 'सीता' कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव!

प्रख्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीने प्रकाशनानंतर अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. अशातच आता पुन्हा एकदा या कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. इचलकारंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकारंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने 'सीता' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात नागपूरच्या 'अभिव्यक्ती' वैदर्भीय लेखिका संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार 'सीता' या साहित्यकृतीला प्रदान करण्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121