'प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिम राबविणार'

    06-Dec-2020
Total Views |

navi mumbai_1  



नवी मुंबई:
नजिकच्या काळात प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेला चालना देण्याचा माजी आमदार संदीप नाईक यांचा मनोदय आहे. पर्यटनस्थळ श्री. गवळीदेव येथे ग्रीन होप संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहिम तसेच ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात ग्रीन होप, संत निरंकारी मंडळ, मध्य रेल्वे मंडळ, विविध सामाजिक संस्था, एनएसएस, लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नवी मुंबईकरांना केले.

माजी खासदार डाॅ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, रेल्वेचे अधिकारी संदीप तिवारी, श्री दुर्वे, शिल्पा किरकींडे, एस पी म्हात्रे, गीता करूप, मेधा पवार, राजीव कुमार सिंग, टी आर वर्मा, विनोद देवी, वैशाली या मान्यवरांसह आयोजक संस्थांचे प्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, नागरिक कोरोनाची खबरदारी बाळगून मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छ भारत सर्वेक्षणअंतर्गत १ डिसेंबर रोजी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरखैरणे येथे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला होता. नवी मुंबईतील डोंगराळ भाग, खाडीकिनारा, रेल्वे स्थानके अषा सर्वच भागात १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

गवळीदेव येथील स्वच्छता करताना मोठया प्रमाणावर प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा उचलण्यात आला. अशी माहिती देत माजी आमदार संदीप नाईक यांनी निसर्गाला हानी होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, कोरोना काळातील लाॅकडाउनमुळे पर्यावरणपुरक पिशव्या सहज उपलब्ध होत नव्हत्या परिणामी प्लास्टिक बॅगचा वापर वाढला. परंतु आता अनलाॅक झाल्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक बॅगचा वापर थांबवावा.स्वच्छता हा एक दिवसाचा विषय नसून सातत्याने करण्याचे काम आहे. आपण सर्वांनी मिळून निष्चय केला तर स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई पहिला क्रमांक नक्की पटकावले, असा विश्वास व्यक्त करतानाच केवळ नंबर मिळविण्यासाठी महत्वाची नाही तर खऱ्या अर्थाने शहरात स्वच्छता नियमितपणे राखली पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.


डाॅ. आंबेडकर भवन जगाला प्रेरणादायी ठरेल


भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करीत ऐरोलीतील नवी मुंबई महापालिकेचे निर्माणाधिन डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवन केवळ देशालाच नाही तर जगाला प्रेरणा देणारे ठरेल, अशी भावना माजी आमदार संदीप नाईक प्रगट केली आहे. या भवनाचे काम गुणवत्तापूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी लोकनेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आयुक्तांनी ती मान्य केली असून डाॅ. आंबेडकर भवनाच्या कामाचा आढावा घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.