मुंबई : माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ते टी एच कटारिया मार्ग परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे (तरंगता पूल) शाहूनगर बीट क्र.३, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बहुतेक विद्युत खांबातील लाईटी बंद पडलेली आहे. गेल्या अनेक दिवसपासून विद्युत खांबामधील लाईटचं गायब आहे.वारंवार पालिका व बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील अद्यापही काही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी सांगितले.
माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.माटुंगा वेस्टर्न रेल्वे या ठिकाणाहून लेबर कॅम्प ,शाहू नगर,धारावी आदि ठिकाण्यावरुन कामावरुन येणा-या नागरीकांची संख्या मोठी आहे.त्यात महिलांची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुचित प्रकार किंवा अपघात होण्याची शक्यता आहे.येत्या पंधरा दिवसात टी एच कटारिया मार्ग, आंध्रा व्हॅली रोड या परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे आदि रस्त्यावर पथदिवे नाही बसविल्यास मुंबई महानगर पालिका व बेस्ट प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भालेराव यांनी दिला.