गोखले पूलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक
02-Dec-2023
Total Views |
मुंबई: अंधेरी रेल्वे स्थानक येथे गोपाळकृष्ण गोखले पूलाच्या गर्डर स्थापित करण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२. ४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर काही उपनगरीय सेवा ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.ज्यांची यादी उपनगरातील संबंधित विभाग स्थानकांवर उपलब्ध असेल.
दि. २ डिसेंबर 2023 रोजी प्रभावित होणार्या अंतिम उपनगरीय सेवा
१. चर्चगेट ते विरारपर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची स्लो लोकल चर्चगेटहून रात्री ११.५८ वाजता सुटेल आणि विरारला दि. ३ डिसेंबरला सकाळी १.४० (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) पोहोचेल.
२. चर्चगेट ते बोरिवली पर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची धोनी लोकल चर्चगेटहून रात्री ११.५२ वाजता सुटून बोरिवलीला दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२.५८ वाजता (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) पोहोचेल.
३. चर्चगेट ते वांद्रेपर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची धीमी लोकल चर्चगेटहून ३ डिसेंबर रोजी सकाळी १ वाजता (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) सुतेल आणि वांद्रे येथे सकाळी १.३० वाजता पोहोचेल.
४. विरार ते चर्चगेट पर्यंतची शेवटची धीनी लोकल विरारहून रात्री ११.४९ 23.वाजता सुटेल आणि चर्चगेटला दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १.२६ वाजता (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) पोहोचेल.
5. बोरिवली ते चर्चगेट पर्यंतची शेवटची धीमी लोकल बोरिवलीहून दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२.१० वाजता (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) सुटेल आणि चर्चगेटला सकाळी १.१५ वाजता पोहोचेल.
६. विरार ते गोरेगाव पर्यंतची शेवटची धीमी लोकल विरारहून दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२.०५ वाजता (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) सुटेल आणि सकाळी १२.५० वाजता गोरेगावला पोहोचेल.
प्रभावित होणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या
- गाडी क्र. १९०३८ बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंतच धावेल.
- गाडी क्र. ०९१८४ बनारस-मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष सुरत-विरार सेक्शन दरम्यान एका तास थांबवली जाईल.
- गाडी क्र. ०९०५३ भुसावळ-मुंबई सेंट्रल ट्राय साप्ताहिक विशेष सुरत-विरार सेक्शन दरम्यान ३० मिनिटे थांबवली जाईल.
- गाडी क्र. २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल गोरेगाव येथे ४० मिनिटे थांबवण्यात येईल.
- गाडी क्र. २२९०४ भुज-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एसी एक्सप्रेस २०२३ विरार-अंधेरी दरम्यान १५ मिनिटे थांबवण्यात येईल.