कराची-रावळपिंडी एक्सप्रेसला भीषण आग, ६२ प्रवासी मृत्युमुखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |



पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या आगीमुळे ३० प्रेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना मुल्तानच्या बीवीएच बहावलपूर आणि पाकिस्तान-इटालियन मॉडर्न बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रहीम यार खानचे उपायुक्त जमील अहमद यांच्या देखरेखीखाली बचावकार्य सुरू करण्यात आहे.

एक्सप्रेसमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे एक्सप्रेसचे तीन डबे जाळून खाक झाले आहेत. दरम्यान पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील रहीम यार खान या ठिकाणी कराची - रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज सकाळी ही भीषण आग लागली. त्यानंतर काही प्रवाशांनी जीव वाचवत धावत्या एक्सप्रेसमधून उद्या घेतल्या मात्र आगीच्या लोटांमुळे काही प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.

सध्या तेथे बचावकार्य सुरु असून रहीम यार खान स्थानकाचे उपायुक्त जमील अहमद घटनास्थळाची माहिती आणि बचावकार्याविषयी देखरेख करत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@