अयोध्या धाम जंक्शनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण!
30-Dec-2023
Total Views |
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री आणि मंत्रीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या धाम जंक्शन येथून अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदी यांचं अयोध्येत पोहोचताच जंगी स्वागत करण्यात आलं.
काही वेळातच पंतप्रधान महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. दोन्ही ठिकाणे रामकथा थीमवर सजवण्यात आली आहेत. याशिवाय पंतप्रधान 16 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. श्रीराम जन्म भूमीचे भव्य दिव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी १२ वाजून ३० मिनिटांच्या जवळपास रामलला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीपासून सात दिवसांचे अनुष्ठान करण्यात येणार आहे.