मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Banned from celebrating Eid in Pakistan) पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यापासून रोखण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना त्यानुसार शपथपत्रे देखील भरण्यास भाग पाडण्यात आलेय आणि इशाराही दिलाय की, जर त्यांनी ईद साजरी केली तर त्यांना ५ लाख रुपये दंड भरावा लागेल. अशी माहिती आहे की, अहमदिया समुदायावर घरांमध्ये धार्मिक विधी आणि कुर्बानी देऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे.
हे वाचलंत का? : कुर्बानीसाठी आणलेल्या ४०० हून अधिक बकऱ्यांना जैन समुदायाकडून जीवनदान!
मिळालेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी पोलीस अहमदी लोकांना ताब्यात घेत आहेत आणि त्यांना धमकी देऊन किंवा त्रास देऊन शपथपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडत आहेत. पाकिस्तानमधील अहमदिया समुदाय नेहमीच सरकार आणि कट्टरपंथीयांचे लक्ष्य राहिला आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या जून २०२४ च्या अहवालानुसार, पंजाबमध्ये किमान ३६ अहमदी लोकांना ईदची कुर्बानी देण्यापासून रोखण्यासाठी मनमानीपणे अटक करण्यात आली.