अंतराळवीर शुभांशू शुक्ला नवभारताचे प्रेरणास्थान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    28-Jun-2025   
Total Views | 9

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे नवभारताचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कॅप्टन शुभांशू यांच्यासोबतच्या संवाददरम्यान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी शुभांशू यांना सांगितले की, आज ते मायभूमीपासून दूर आहेत, मात्र कोट्यवधी भारतीयांचे मने त्यांच्यासोबत जोडलेली आहेत. आपरण १४० कोटी भारतीयांच्या वतीने संवाद साधत असून अंतराळात भारताचा ध्वज उंचावून नव भारताचे प्रेरणास्थान झाल्याचे पंतप्रधांनी शुभांशू यांना सांगितले.

पंतप्रधान मोदींनी शुभांशू यांनी विचारले की अवकाशाची विशालता पाहिल्यानंतर तुमचा पहिला विचार काय होता. शुभांशू म्हणाले की त्यांचा पहिला विचार असा होता की बाहेरून कोणतीही सीमा दिसत नाही. त्यांनी सांगितले की परंतु भारत खरोखरच खूप भव्य दिसतो. तो नकाशावर दिसत असलेल्यापेक्षाही अधिक भव्य आहे. त्यांनी असेही म्हटले की, अवकाशातून पाहिले असता सीमारेषा धूसर होतात आणि संपूर्ण जग एका कुटुंबाप्रमाणेच दिसते. त्याचप्रमाणे भारतासाठी ही अतिशय मोठी संधी असून भारतीयांसाठी ‘स्काय इज द लिमीट’ अर्थात ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ असल्याचेही शुभांशू यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी दिला ‘गृहपाठ’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझी सवय आहे की मी जेव्हा जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा त्यांना गृहपाठ देतो. पंतप्रधान मोदींनी शुभांशूला सांगितले की, तुमचा गृहपाठ असा आहे की, तुम्हाला मिळणाऱ्या अनुभवानेच भारता पुढे गगनयान मोहिम, चांद्रयान मोहिम आणि त्याद्वारे भारतीय अंतराळवीरास चंद्रावर उतरवायचे आहे. त्यावर शुभांशू य़ांनीदेखील त्यास दुजोरा दिला.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121