येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या'या'भारतीय परिचारिकेला १६ जुलै रोजी फाशी!

    15-Jul-2025
Total Views |

Indian nurse who is serving a death sentence in Yemen will be hanged on July 16
 
साना: यमेनमध्ये एका हत्येच्या आरोपात दोषी ठरलेल्या आणि सध्या मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला दि. १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. निमिषावर येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहदीची हत्या केल्याचा आरोप आहे. ज्या ती क्लिनिक चालवत होती.
 
येमेनमधील सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल बास्करन यांनी याबाबत सांगितले कि, "सरकारी वकिलाने तुरुंग अधिकाऱ्यांना खटल्याचे पत्र दिले आहे. १६ जुलै रोजी निमिषाच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे." असे बास्करन म्हणाले. हत्येप्रकरणी २०२० मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२३ मध्ये येमेनी सर्वोच्च न्यायिक परिषदेने हत्येची गंभीर दखल घेत निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली.
 
क्लिनिकमधीलच औषधाच्या मदतीने केली हत्या
 
२०१५ मध्ये तिने तलालसोबत भागीदारी करून येमेनची राजधानी साना येथे एक क्लिनिक उघडले होते. येमेनच्या कायद्यानुसार फक्त स्थानिक नागरिकांनाच व्यवसाय करण्याची परवानगी आहे. यासाठी तीने तलाल चा वापर करून घेतला. काही महीन्यातच दोघांमध्ये क्लिनीक मधून येणारा पैसा आणि विविध कारणांवरून टोकाचे वाद होऊ लागले. सारख्या होणाऱ्या वादाचा बदला म्हणून निमिषाने तलालच्या हत्येचा प्लॅन आखला आणि क्लिनिकमधीलच शामक औषधाच्या इंजेक्शनचा ओवरडोस देऊन तलालची तिने हत्या केली.