दोन महिलांचे भांडण, कॉकपीट उघडण्याचा प्रयत्न, स्पाईसजेटच्या विमानाचे ‘इमर्जन्सी लॅण्डींग’
15-Jul-2025
Total Views |
नवी दिल्ली : नवी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानातील एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. या विमानातील दोन महिलांमध्ये झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पायलटला या विमानाचे आपत्कालीन लँडीग करणे भाग पडले.
सोमवार दि. १४ जुलै स्पाइसजेटच्या एका विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण केले. उड्डाण होऊन काही वेळ होताच विमानात बसलेल्या दोन महिला आपापसात भांडू लागल्या, हे भांडण इतके विकोपाला पोहचले की, या महिलांकडून कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला.
अखेर पायलटने या भंयकर भांडणाची खबरदारी घेत विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँड केले. याबद्दल मिळालेल्या माहीतीनुसार, या दोन महिलांमधील भांडणाने विमानातील उर्वरित प्रवाशांनाही त्रास होऊ लागल्याने प्रवाशांनसह फ्लाइट क्रू मेंबर्सनी दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू दोघींमधील भांडणात काहीच फरक पडला नाही, पायलटनेही घोषणा करत या दोघींना त्यांच्या जागी बसण्याची विनंती केली मात्र याचा काही परिणाम न होता उलट त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
शेवट पायलटने विमान पुन्हा दिल्ली विमानतळाकडे वळवत आपत्कालीन लँडीग करत या महिलांना विमानातून उतरवत त्यांना सीआयएसएफच्या ताब्यात दिले. या सर्व प्रकारानंतर विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले.