पहलगाम हल्ल्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चिदंबरम यांची एक्सवर पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

    28-Jul-2025   
Total Views |


नवी दिल्ली : (P Chidambaram clarifies his statement on pahalgam terror attack)
संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत होणाऱ्या चर्चेपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त टिप्पणीमुळे चिदंबरम टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यानंतर त्यांनी आता त्यांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे.


सोशल मीडियावर पोस्ट दरम्यान, पी चिदंबरम यांनी एक्स अकांऊटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, "ट्रोलिंग वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. यापैकी सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे ज्या ट्रोलिंग मध्ये संपूर्ण मुलाखत वगळून त्यातील दोन वाक्यं घ्यायची, काही शब्द म्यूट करायचे आणि वक्त्याच्या प्रतिमेस काळे रंग द्यायचे. संपूर्ण मुलाखत क्विंटवर उपलब्ध आहे. मुलाखतीत अनेक प्रश्न विचारले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चेदरम्यान इंडी ब्लॉक हे आणि असे बरेच प्रश्न उपस्थित करेल."

काय म्हणाले होते चिदंबरम?

द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी काही प्रश्न उपस्थित करतेवेळी म्हटले की, "तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख एनआयएने पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरून? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं?" असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. चिदंबरम यांच्या या टिप्पणीने राजकीय वादळ निर्माण झाले. आता चिदंबरम यांनी त्यांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे.





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\