वॉशिंग्टन : (Donald Trump On Vladimir Putin) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ धोरणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. या निर्णयामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना देखील अमेरिकेविरोधी भूमिका घेतल्यास मोठ्या आर्थिक भुर्दंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियाला इशारा दिला आहे.
रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाबाबत पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांनी रशियाला धमकीवजा इशारा दिला आहे. ते म्हणाले, जर व्लादिमीर पुतिन यांनी पुढील ५० दिवसांत युक्रेनसोबत युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली नाही तर रशियाविरुद्ध कठोर टॅरिफ लागू करण्यात येईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
...१०० टक्के टॅरिफ असेल
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "युक्रेनबरोबरील युद्धबंदी करण्यास रशियाने सहमती दर्शवली नाही आणि ५० दिवसांत युद्धबंदी करार झाला नाही तर आम्ही रशियावर दुय्यम कर लादणार आहोत आणि मग ते १०० टक्के टॅरिफ असेल", असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\