श्रीगोंदा तालुक्यात शरद पवार गटाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    15-Jul-2025   
Total Views | 21

मुंबई : श्रीगोंदा तालुक्यातील शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवार, १५ जुलै रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, शहर अध्यक्ष धनराज कोथिंबीरे यावेळी उपस्थित होते. श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाषराव काळाने, शरद पवार गटाचे बेलवंडीचे माजी सरपंच, बेलवंडी व्यापारी पतसंस्था चेअरमन उत्तमराव डाके, तांदळी दुमालाचे सरपंच आणि उद्योजक संजय निगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यासोबतच मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुदेश (बंडू) मांडे यांच्यासोबत तांदळी दुमाला येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी सरपंच देविदास भोस, विद्यमान उपसरपंच संतोष हराळ, माजी उपसरपंच तुषार धावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास गंगाधरे, नरसिंग भोस, झुंबर खरांगे, संतोष बोरुडे, तांदळेश्वर सोसायटीचे माजी संचालक प्रवीण काळेवाघ, जयसिंग भोस, कुंडलिक काळेवाघ, दगडू काळेवाघ यांचा समावेश आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121