३०० बंदुका, ५० हजार काडतुसे; पोलिसांच्या छापेमारीत मोठा शस्त्रसाठा जप्त!

    28-Jun-2025   
Total Views | 49

मुंबई : लखनौमध्ये एका घरातून बेकायदेशीर शस्त्रे, काडतुसे आणि ते बनवण्याच्या साधनांचा मोठा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हकीम सलाहुद्दीन उर्फ लाला नावाच्या एका इसमाच्या घरातून ही शस्त्रे जप्त करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ३०० बंदुका आणि ५०,००० काडतुसे जप्त केल्याची माहिती आहे. कडक सुरक्षेत हा छापा टाकण्यात आल्यानंतर परिसर पूर्णतः सील करण्यात आला होता.

अशी माहिती आहे की, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा काडतुसांच्या पिशव्या आणि शेकडो पूर्ण व अर्धवट तयार शस्त्रे जप्त करण्यात आली. सध्या एसटीएफचे पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना शस्त्रांच्या बेकायदेशीर पुरवठ्याबाबत माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून छापा टाकला. पोलीस सलाहुद्दीनच्या साथीदारांचा शोध घेत असून इतर आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121