मुंबई : बांग्लादेशात ढाका येथील दुर्गा माता मंदिर प्रशासनाच्या कडक सुरक्षेत पाडल्याने येथील हिंदूंमध्ये तीव्र सताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बांगलादेश हिंदू महासंघासह येथील हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेनेही बांग्लादेश बंदची हाक दिली आहे. अनेक शहरांमध्ये या प्रकरणी निदर्शने करण्यात आली. अल्पसंख्याक हिंदू समुदायाने अनेक जिल्हे आणि विद्यापीठ परिसरात मानवी साखळी केल्याचे दिसून आले.
हिंदू समुदायाचे म्हणणे आहे की, मंदिर परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामे सुद्धा आहेत. असे असतानाही मंदिर आणि त्यातील मूर्तींना बेकायदेशीर ठरवून पाडणे हे सिद्ध करते की, बांगलादेश सरकार कट्टरपंथीयांसमोर लाळघोटेपणा करत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, मंदिरातील मूर्तींचे आदरपूर्वक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील १०० दुकाने, राजकीय पक्षांची कार्यालये, एका कच्च्या बाजारावरही कारवाई करण्यात आली. मात्र घनटास्थळची परिस्थिती पाहिल्यास प्रशासनाने मंदिर आणि मूर्तींवर जेसीबी चालवल्याचे स्पष्ट दिसतेय. यालाच विरोध म्हणूनच हिंदूंकडून बांगलादेश बंदची हाक देण्यात आली.