संभाजी महाराजांवर आधारित 5 मराठी पुस्तके

    14-May-2024
Total Views |
 
sambhaji
 
 
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजही स्वराज्याचे दुसरे छत्रपती. आज दि. १४ मे म्हणजे त्यांची जयंती. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यावर आधारित लेखकांनी लिहिलेली पुस्तके पर्वणीच. मेहता प्रकाशनाने त्यांच्यावर आधारित पुस्तके प्रकाशित केली आहेत. विश्वास पाटील यांनी लिहलेली संभाजी कादंबरी, डॉ. जयसिंगराव पवार यांचे छत्रपती संभाजी एक चिकित्सा, तसेच छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथाचे संपादन देखील जयसिंगराव पवार यांनी केले आहे. त्यांनीच युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी या प्रकरणावर विशेष पुस्तक लिहिले आहे. शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी सुद्धा विशेष गाजली.
 
संभाजी - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी महाराष्ट्राच्या मातीवर कधीही न फिटणारे उपकार केले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे मूर्तिमंत त्याग , बलिदान , जिद्द , बळकटता , महत्वकांक्ष आणि विशालतेचे प्रतीक आहेत . छत्रपती शिवाजी महाराज हे " जगावं कसं " याचं जाज्वल्य उदाहरण तर छत्रपती संभाजी महाराज हे " मरावं कसं " ह्याचं तेजस उदाहरण आहेत . स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी राजे ह्यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं . एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन , जिजाऊ माता सारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलयं फिरत राहिली . राज्यकारभारयांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप , गृहकलह‌ , फंदफितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या . वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू , कोणत्या वयात बोट भरून चालला शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू ह्यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं . विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजीराजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते . अनेक इतिहासकार संभाजी राजांचे चरित्र मलीन करण्यात व्यस्त होते , अनेक लेखक यांना बदफैली ठरवत असताना अनेक सुजाण लेखक , इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राला न्याय दिला . त्याचेच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी.
 
छत्रपती संभाजी एक चिकित्सा - छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा आत्तापर्यंत तुम्ही छावा किंवा संभाजी कांदबरी वाचली असेल परंतु अस्सल कागदपत्रे आणि पुरावे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल नक्कीच हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. खालील काही बाबींवर त्या प्रकाश टाकण्यात आला आहे. १) संभाजी महाराजांच्या आयुष्यातील गोदावरी, थोरतांची कमळा वगैरे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. २) चिटनीसी बखर ही मल्हार रामराव चिटणीसाने त्याच्या पूर्वजांना हत्तीच्या पायी दिल्याच्या रागातून फक्त संभाजी महाजांची बदनामी करायला लिहिली. ३) संभाजी महाराजांसमोर राज्य विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा थोरल्या महाराजांनी ठेवला तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावत आम्ही आपल्या पायाशी दूध भात खाऊन राहू असे सांगितले ४) संभाजी महाराज त्यांना डावललं जात असल्याचा भावनेतून दिलेरखनास जाऊन मिळाले ही त्यांची एकमेव चूक ५) छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाशी ९ वर्ष प्रखर संघर्ष एकाच वेळी पाच शाह्यांवर वर्चस्व ६) पित्यासारखे संपूर्ण निर्व्यसनी ७) शिर्क्यांसारखे आपलेच माणसं फितूर झाल्याने घात. ८)पकडले गेल्यावरही बाणेदारपणे औरंगजेबाला सामोरे गेले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळतील.. शेवटी एकच यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग। ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग। त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग।। मराठ्यांचे दुसरे छत्रपती शंभू राजेंस मानाचा मुजरा!
 
युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी - संभाजी स्मारक ग्रंथाच्या संपादनाच्या निमित्ताने डॉ. जयसिंगराव पवार यांचा साहित्यिक कलावंत द.ग. गोडसे यांच्याशी पत्र-परिचय झाला आणि त्यांचा पत्रव्यवहार स्मारक ग्रंथाच्या प्रकाशनापर्यंत चालू राहिला. संभाजीराजे, गोदावरी, मस्तानी या ऐतिहासिक व्यक्तींबरोबरच, ‘दगं’ची आवडती अवकाश संकल्पना, त्यांची शिवकालीन मराठी साहित्याविषयीची व मराठी इतिहासकारांसंबंधीची मते, जॉर्ज बर्नाड शॉ आणि त्यांची मैत्रीण मोनालिसा असे अनेक विषय या पत्रव्यवहारातून येऊन जातात. एखाद्या साहित्यिक कलावंताचे पत्रलेखनही किती कलात्मक व सर्जनशील असू शकते याचे हे उत्कट उदाहरण आहे. या पुस्तकाला तीन परिशिष्टं जोडली असून, पहिल्या परिशिष्टात संभाजीराजा आणि गोदावरीची लोककथा उद्धृत केली आहे. दुसऱ्या परिशिष्टात प्राचार्य म. द. हातकणंगलेकर यांनी द. ग. गोडसे यांच्यावर लिहिलेला लेख समाविष्ट केला आहे. तर तिसऱ्या परिशिष्टात द. ग. गोडसे यांची चरित्र - रूपरेखा दिली
 
छावा - ‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!