ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य होणार : पंतप्रधान मोदी

    26-May-2023
Total Views |
Trans Harbor Link Narendra Modi

मुंबई
: देशातील सर्वांत लांब सागरी सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मार्गावरील प्रवास सुखद आणि तितकाच संस्मरणीय ठरणार आहे. या पुलाचे वर्षअखेरीस लोकार्पण होणार असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी येथील कामांची पाहणी करून आढावा घेतला. त्या संदर्भातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले त्या ट्वीटला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून हजारो जणांनी ते पाहून फॉरवर्डही केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एमटीएचएलची गुणवैशिष्ट्ये सांगणार्‍या ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. “या अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे देशातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर होण्यास पाठबळ मिळेल,” असे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हणत या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.