नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरात दुसरा प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. आता भगवान श्रीराम मंदिरात ‘राजा’ म्हणून विराजमान होतील.
श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राजा रामाचा दरबार असेल. या दरबारात भगवान श्रीरामासोबत लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सिता आणि हनुमान असतील. आज ४ जून रोजी, अभिजीत मुहूर्तावर दुपारी १:२५ ते १:४० दरम्यान भगवान श्रीरामांचा भव्य आणि दिव्य राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. यासोबतच, इतर उपमंदिरांमध्ये स्थापित केलेल्या मूर्तींचाही अभिषेक केला जाईल. चंडौली येथील पंडित जयप्रकाश १०१ वैदिक आचार्यांसह हे कार्य पूर्ण करतील. या शुभ मुहूर्तप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
त्याआधी सोमवारी, म्हणजे २ जून रोजी, शेकडो महिलांनी कलशमध्ये शरयूचे पाणी घेऊन शरयू नदीच्या काठावरून एक मोठी कलश यात्रा काढली. तत्पूर्वी, वैदिक आचार्यांनी प्राण प्रतिष्ठानचे मुख्य यजमान अनिल मिश्र यांचे यजमान पूजन केले. मंगळवारी सकाळी ६:३० वाजतापासून हा विधी सुरू झाला आणि संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत तो सुरू होता.