‘बोइंग’ची प्रतिमा वाचवण्यासाठी परदेशी प्रसारमाध्यमांचा कावा - वैमानिकांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न

    15-Jul-2025   
Total Views | 10

नवी दिल्ली,  एअर इंडिया अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर वैमानिकांना दोषी ठरवून ‘बोइंग’ची प्रतिमा वाचविण्यासाठी परदेशी प्रसारमाध्यमे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या अपघाताबाबत एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा (एएआयबी) प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यामध्ये, अपघाताचे मुख्य कारण म्हणजे ‘फ्युएल कंट्रोल स्विच’ बंद होणे. त्यामुळे इंजिनला इंधन पोहोचले नाही व ते बंद पडले. चौकशीदरम्यान पायलटांमध्ये या स्विचबाबत संवादही झाल्याचे नमूद आहे.

परंतु अमेरिकन नियामक एफएए आणि ‘बोइंग’ने मात्र विमानातील फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये काहीही बिघाड नाही, असा दावा केला आहे. एफएएने तर सध्या या स्विचबाबत कोणतीही तपासणी वा सुधारणा आवश्यक नाही, असे म्हटले आहे. याद्वारे एफएएने ‘बोइंग’ची पाठराखण केल्याचे दिसून येते. याचदरम्यान, भारत, दक्षिण कोरिया या देशांनी व एतिहादसारख्या विमान कंपन्यांनी मात्र आपल्याकडजे असलेल्या या विमानांच्या स्विचची तपासणी व सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही अमेरिकन प्रसारमाध्यमे ‘बोइंग’ला वाचवण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसते.

१० जुलैला वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले होते की, चौकशी अहवालात वैमानिकांच्या चुकांकडे बोट दाखवले आहे. मात्र, तोपर्यंत प्राथमिक चौकशी अहवाल आलेलाच नव्हता. नंतर १२ जुलैला आलेल्या एएआयबीच्या अहवालात वैमानिकांवर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवलेला नाही. ब्लूमबर्ग, रॉयटर्स, एबीसी न्यूज, एअर करंट या संस्थांनीही ८ ते १० जुलैदरम्यान अशाच आशयाच्या बातम्या दिल्या. नंतर रॉयटर्स, बीबीसी, डेली मेल यांनीही पायलटांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.

‘बोइंग’चा पूर्वेतिहास संशयास्पदच

• ‘बोइंग’ने याआधीही वैमानिकांवर दोष टाकून स्वतःची प्रतिमा वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत. २०१९ व २०२० मध्ये ७३७ मॅक्स विमानांच्या दोन अपघातांत (लायन एअर, इंडोनेशिया व इथिओपियन एअरलाइन्स) ३४६ जणांचा मृत्यू झाला होता.

• ‘बोइंग’चे तत्कालीन सीईओ डेव्हिड कोल्हान यांनी न्यू यॉर्क टाइम्सशी बोलताना आशियाई व आफ्रिकन वैमानिकांचा अनुभव कमी असल्याने हे अपघात घडल्याचे सांगितले होते.

• त्याआधीचे सीईओ डेनिस मुलिनबर्ग यांनीही अमेरिकन काँग्रेससमोर विमान योग्य स्थितीत होते, मात्र वैमानिकांनी योग्य पावले उचलली नाहीत, असा दावा केला होता.

• नंतरच्या चौकशीत या दोन्ही अपघातांचे खरे कारण ‘बोइंग’च्या एमसीएएस नावाच्या सॉफ्टवेअरची चूक असल्याचे सिद्ध झाले. ‘बोइंग’ने हे सॉफ्टवेअर वैमानिकांना न सांगता विमानात सक्रिय केले होते. त्यामागे प्रशिक्षण व प्रमाणनाचा खर्च टाळायचा होता.

• या लपवालपवीमुळे ‘बोइंग’ला जवळपास २० हजार कोटी रुपये दंड भरावा लागला होता आणि एमसीएएससॉफ्टवेअरमध्ये दोष असल्याचे मान्य करावे लागले होते.

• एअर इंडिया अपघातातही अशीच पद्धत दिसत आहे. ‘बोइंग’च्या चुकीऐवजी वैमानिकावंर दोष ढकलून त्यांची प्रतिमा वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी - अमित शहा, राजनाथसिंग, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंग चौहान, नीती आयोगात भेट

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी - अमित शहा, राजनाथसिंग, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंग चौहान, नीती आयोगात भेट

राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच नीती आयोगाशी या बैठका झाल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121