कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत एकूण ५ रुमवर हातोडा मारण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी दि ३ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून नांदप रोड टिटवाळा येथे सुरू असलेले २ रूम चे बांधकाम, तसेच नांदप रोड येथील १ रूम,व शांताबाई नगर गाळेगाव येथील २ रूम चे अनाधिकृत बांधकाम असे एकूण ५ रूम चे बांधकामांवर कारवाई करत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. सदर कारवाई महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.