डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीत पर्यावरण आणि आरोग्य या विषयी जनजागृती करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त दि. 3 जून रोजी
एका सायकल फेरीचे आयोजन केले होते. यात एकूण अंदाजे 40 जण सहभागी झाले होते. निवासी मधील काही प्रमुख रस्त्यावरून फिरून त्यांनी घोषणेद्वारे पर्यावरण, आरोग्य व व्यायाम संदर्भात जनजागृती केली. याच सायकल ग्रुप तर्फे महिला, पुरुष आणि मुले असे एकूण 42 जण पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त वारीत सहभागी होण्यासाठी सायकलने जाणार आहेत. पंढरपूरला जाण्यासाठी दि. 18 जून रोजी निघणार असून पुन्हा 22 जून रात्री परतणार आहेत. तेथील वास्तव्यात पंढरपुरात येणार्या वारकऱ्यांची सेवा, मदत हे सर्वजण करणार आहेत. त्यांच्या सोबत बस, टेम्पो, रुग्णवाहिका राहणार आहे. या पंढरपुर वारीसाठी या सायकल ग्रुपला आणि वारकऱ्यांसाठी ज्यांना आर्थिक व वस्तू स्वरुपात ( पाण्याच्या बॉटल, एनर्जी ड्रिंक्स, औषधे, बिस्किटे, शेंगदाणे, बटर चिक्की, ORS ड्रिंक्स, फळे इत्यादी खाद्य पदार्थ ) मदत करावयाची आहे त्यांनी सढळहस्ते मदत करावी अशी विनंती संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
संपर्क :- सौ. हर्षल सरोदे 8424927311 शुभम उदबत्ती स्टॉल, कावेरी चौक, एमआयडीसी, डोंबिवली.