मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ‘ग्लोबल गुंतवणुकीचा’ मुहूर्त

- बीकेसीतील 3 प्रमुख भूखंडांचे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटप - बीकेसीतील भूखंड विक्रीतून ₹3840 कोटींचा महसूल; 15,000 हाय-टेक नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

    03-Jun-2025
Total Views | 9

Chief Minister devendra Fadnavis inaugurates Global Investment in Mumbai
 
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमिटोमो रिअ‍ॅलिटी अँड डेव्हलपमेंट (जपान) व ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बीकेसीतील 3 महत्त्वाच्या भूखंडांचे वाटपपत्र आज प्रदान करण्यात आले. या व्यवहारातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) एकूण ₹3840.49 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, या माध्यमातून सुमारे 15,000 हाय-टेक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
सुमिटोमो कंपनीच्या भारतीय उपकंपनीने बीकेसीतील सी-13 व सी-19 या दोन भूखंडांसाठी सर्वोच्च बोली लावली. तर ब्रूकफिल्डच्या उपकंपनीने सी-80 हा भूखंड मिळवला. यापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 55व्या वार्षिक बैठकीदरम्यान दोन्ही कंपन्यांसोबत अनुक्रमे 5 अब्ज व 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
या प्रकल्पांमुळे बीकेसी हे केंद्र लवकरच देशातील नंबर 1 व्यावसायिक हब होईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत USD 300 अब्ज अर्थव्यवस्था व 30 लाख रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वपूर्ण असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त तसेच जपानचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121