धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीची ८.५ हेक्टर जमीनीला मंत्रिमंडळाची मान्यता

    03-Jun-2025
Total Views | 9
 
Cabinet approves 8.5 hectares of Kurla Dairy land for Dharavi redevelopment project
 
मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवार, दि. ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील ८.५ हेक्टर (२१.२५ एकर) जमिनीच्या हस्तांतरणासाठी करारनाम्यातील अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 
या जमिनीवर धारावीतील अपात्र रहिवाशांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आवश्यक असलेली जागा उपलब्ध होणार असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल. त्याशिवाय राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आयोगासाठी आवश्यक पदनिर्मिती, कार्यालयीन जागा आणि अन्य खर्चास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.
 
राज्य कामगार विमा महामंडळाच्या २०० खाटांच्या रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील ६ हेक्टर गायरान जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय, पुणे (बिबवेवाडी), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांसाठीही जमीन देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
 
पथकर सवलतीसाठी भरपाई
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकर सवलतीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर स्थानकांवर दिलेल्या सवलतीमुळे महामंडळास होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई सरकारकडून करण्यात येणार आहे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121