सेक्रेड गेम्समुळे धार्मिक भावना दुखावल्या : गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : ‘सेक्रेड गेम्स २या वेब सीरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा अडचणीत आला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी अनुराग कश्यप यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सेक्रेड गेम्सया सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खानने सरताज सिंह या एका शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

 

१५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या दुसऱ्या भागातील एका दृश्यात सरताज सिंह त्याच्या हातातील कडा काढून समुद्रात काढून फेकतो. बग्गा यांनी या चित्रिकरणाला विरोध केला आहे. बग्गा यांनी या दृश्यावर आक्षेप घेतला. बग्गा यांनी एफआयआरमध्ये कडा हा शिख धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो. हा कडा विश्वासाने आणि आदराने परिधान केला जातोअसे लिहिले आहे.

 

सेक्रेड गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यप शीख धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. यापूर्वीही अकाली दल पक्षाचे खासदार मनजिंद सिंह सिरसा यांनी सेक्रेज गेम्सही वेब सीरिज बंद करण्याची नेटफ्लिक्सला सांगितले होते. ही वेबसिरीज आता पुन्हा वादात अडकण्याची चिन्हे आहेत.

 


 
 
@@AUTHORINFO_V1@@