दिल्लीची तिजोरी रिकामी असली तरी महिलांच्या बँक खात्यात २५०० रुपये जमा होतील - रेखा गुप्ता

रेखा गुप्तांचा दिल्लीच्या आप पक्षाला कानपिचक्या

    23-Feb-2025
Total Views | 22
 
रेखा गुप्ता
 
नवी दिल्ली : दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सरकारची तिजोरी रिकामा असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने दिल्लीतील भाजप सरकारसाठी तिजोरी रिकामी ठेवली. दरम्यान, त्यांनी महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, दरमहा २५०० रुपये देयकाची अंमलबजावणी सविस्तर योजनेसाठी केली जाणार आहे. तसेच माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका लागू केल्या आहेत. ज्या अंतर्गत दिल्लीतील पात्र महिलांना तत्काळ दरमहा २५०० रुपये दिले जाणार आहेत.
 
महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेखा गुप्ता म्हणाल्या आहेत की, अर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बसल्याचे आम्हाला आढळले की, मागील सरकारने तिजोरी खाली केली आहे. तेव्हा दिल्ली सरकारचा खजिना रिकामा असल्याची बाब समोर आली.
 
दरम्यान, त्यांनी बोलत असताना आप आणि काँग्रेसवर हल्ला केला आहे. त्या म्हणाल्या की, गेली १५ वर्षे दिल्लीमध्ये आपचे सरकार होते. मात्र, त्यांनी दिल्ली हिताचे प्रश्न सोडवले नाहीत. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर त्यांनी आता प्रश्नांची सरबत्ती लावली आहे.
 
त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही पहिल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली मात्र, आपने त्या योजनेला हिरवा कंदील दिला नव्हता. आमच्या अहवालावरील पारदर्शकतेवर विरोधक दावा करण्यास घाबरत असल्याचे रेखा गुप्ता म्हणाल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121