भांडुप परिमंडलात 'लाईनमन दिवस’, प्रकाशदूतांचा सन्मान

    04-Mar-2024
Total Views | 32
Bhandup mahavitaran circle

मुंबई : 
भांडूप परिमंडळातील लाईनमन यांचा सन्मान करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे मागच्या वर्षापासून दि. ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो. महावितरणच्या भांडुप परिमंडलातील विविध विभागीय कार्यालयात लाईनमन दिवस साजरा करण्यासाठी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे, तिन्ही मंडळातील सर्व विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या, ऊन असो, वादळ असो किंवा पाऊस असो कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला झोकून काम करणारा ह्या प्रकाशदूतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा 'लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येतो. लाईनमन हे अत्यंत बिकट परिस्थितीत काम करून ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात . त्यांच्या याच अविरत मेहनतीसाठी देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दि. ४ मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो.
 
ठाणे नागरी मंडळाच्या ठाणे- १ विभागातील कार्यक्रमात बोलताना भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील काकडे म्हणाले कि, “ लाईनमन हा महावितरणचा कणा आहे. त्याच्या कामामुळे महावितरणची लोकांमध्ये एक ओळख आहे. अनेक कठीण परिस्थिती निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, महाडचा पूर किंवा कोरोनातला काळ अश्यावेळी स्वतःच्या जीवाची परवा न करता ग्राहकांना प्राधान्य देऊन काम करणारा लाईनमन हा खरोखर कौतुकास्पद आहे व त्यांच्या चांगल्या कामामुळेच ग्राहकांमध्ये आपली एक चांगली प्रतिमा निर्माण होते”. अशा शब्दांत त्यांनी सर्व लाईनमन व सर्व लाईनवूमन यांना शुभेच्छा दिल्या व पुढेही चांगले काम करत राहण्याचे सांगितले.

ठाणे, पेण व वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, इब्राहीम मुलाणी व सिन्हाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय कार्यालयात लाईनमन, लाईनवूमन व बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले व त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिथे लाईनमननी स्वतः गाणी, नृत्य व नाटकात सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय, काही ठिकाणी निशुल्क नेत्रतपासणी शिबीर व भोजन इत्यादी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या कार्यक्रमात भांडूप परिमंडल कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवर्जून आपली उपस्थिती नोंदवली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121