कोमसाप कळवा शाखेच्या वतीने संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान , प्रा.अशोक बागवे यांच्या खास शैलीतून सादर होणार पसायदानाचे निरूपण

    10-Jun-2025
Total Views | 7


ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेची कळवा शाखा नुकतीच स्थापन झाली असून या शाखेचा पहिलाच जाहीर कार्यक्रम शुक्रवार दि. १३ जून रोजी आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक प्रा.अशोक बागवे यांच्या अभ्यासातून निर्माण झालेले संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाचे निरूपण हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी होणार.

आहे.प्रा.अशोक बागवे यांच्या अभ्यासातून निर्माण झालेले पसायदानाचे निरूपण त्यांच्याच खास शैलीतून ऐकण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी कृष्णा जाधव उपस्थित राहणार आहेत. तर कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता किर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डॉ प्रदीप ढवळ,जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि.१३ जून रोजी मनीषा विद्यालय सभागृह, मनीषा नगर, कळवा (प) या ठिकाणी सायंकाळी ६ वा. हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विलास शिंदे कार्यवाह प्रविण सोनावणे आणि कोषाध्यक्ष श्री सुशांत दोडके यांनी केले आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121