बिचाऱ्या उरलेल्या सैनिकांना किती दिवस खोटी आशा दाखवणार? केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना सवाल
20-Jun-2025
Total Views | 40
मुंबई : राज ठाकरेंना आजही तुम्हाला टाळी द्यायची नाहीच. बिचाऱ्या अजून तुमच्या आशेवर असणाऱ्या उरल्या सैनिकांना किती दिवस खोटी आशा दाखवणार? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात झालेल्या ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी टीका केली.
देशाला पंतप्रधान नाही हे @uddhavthackeray यांचे विधान एकून उध्दवजी हे अजून ‘आग लगे बस्तीमे मस्त रहो मस्तीमे’ याचं मुड मध्ये आहेत हे लक्षाच येत. अहो उध्दवजी देशाला @narendramodi च्या रूपाने कणखर पंतप्रधान आहेत, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांचा…
केशव उपाध्ये म्हणाले की, "देशाला पंतप्रधान नाही हे उद्धव ठाकरे यांचे विधान ऐकून उध्दवजी हे अजून ‘आग लगे बस्तीमे मस्त रहो मस्तीमे’ याच मुडमध्ये आहेत हे लक्षात येते. उध्दवजी देशाला नरेंद्र मोदींजींच्या रूपाने कणखर पंतप्रधान आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांचा रूपात भरपूर सैनिक आहेत. प्रश्न तुमच्या आसपास कोणी नाही हे आधी पहा. पक्ष गेला, चिन्ह गेल, सैनिक गेले, विधानसभेत लोकांनी नाकारले. कधीकाळी नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे अशा सक्षम नेत्यांनी भरलेला तुमचा स्टेज आता सगळं गमावल्यानंतर तुम्ही, आदित्य आणि संजय राऊत सोडले तर ओकबोक दिसतोय याचा विचार करा," असा टोला त्यांनी लगावला.
"राहता राहिला प्रश्न राज ठाकरे यांच्या भेटीगाठीचा. तर ज्यांना तुम्हीच पक्षाबाहेर काढले, त्यांना अपमानित केले, त्यांचे नगरसेवक पळविले त्यांना आजही तुम्हाला टाळी द्यायची नाहीच. बिचाऱ्या अजून तुमच्या आशेवर असणाऱ्या उरलेल्या सैनिकांना खोटी आशा किती दिवस दाखवणार?" असा सवाल केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला.