
सोलापूर : रावगाव ता. करमाळा जिल्हा सोलापूर येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी रामदास कांबळे म्हणाले, अण्णा हजारे यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी दुर्मिळ आणि प्रेरणादायी आहे. प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवतो आणि भविष्यातही समाजोपयोगी संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न करू.
कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया मंडलिक, सचिव सचिन मंडलिक, प्रा. डॉ. सुभाष गायकवाड, माऊली शिक्षण संस्थेचे अनिकेत पठारे, साहित्यिक प्रा. विजय लोंढे, फार्मसी कॉलेज शिरूरचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिवरे, ईगल फाउंडेशनचे नवनाथ मोरे, उद्योजक राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.