छत्रपती शिवरायांच्या 'या' किल्ल्यांना भेट द्या आणि...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

    12-Jul-2025
Total Views |


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा इतिहास जाणून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये १२ भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी ११ महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात. या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या," असे आवाहन त्यांनी केले.


जागतिक वारसा यादीत कोणत्या किल्ल्यांचा समावेश?
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121