हिंगोली : (Hingoli) महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातून महिलांच्या आरोग्याबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात संजीवनी योजनेअंतर्गत २.९ लाख महिलांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी मोहिमेत १४ हजार ५४२ महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात याबाबत लेखी उत्तराद्वारे माहिती दिली. संजीवनी योजनेअंतर्गत केलेल्या या तपासणी मधून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील तीन महिलांना गर्भाशयाचा कर्करोग, एकीला स्तनाचा कर्करोग आणि तब्बल आठ महिलांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोग्यमंत्र्यांनी हेही सांगितले की, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कर्करोग्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या तत्काळ उपचारांसाठी मोहीम सुरू केली आहे. कर्करोगाच्या निदानासाठी ग्रामीण भागात आरोग्य शिबिरं आणि तपासणी आयोजित केली जातात. तसेच आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेत राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\