जनसुरक्षा विधेयकावर आक्षेप घेण्यापूर्वी किमान 'या' नेत्यांशी तरी चर्चा करायची! केशव उपाध्ये यांची ठाकरे-राऊतांवर टीका
12-Jul-2025
Total Views |
मुंबई : जनसुरक्षा विधेयकावर आक्षेप घेण्यापूर्वी किमान महाविकास आघाडीच्या नेत्यांशी तरी चर्चा करायची, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना केला आहे. त्यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे-राऊतांवर निशाणा साधला.
खरतर आक्षेप घेण्यापूर्वी किमान त्यांच्या पक्षाच्या अंबादास दानवे, भास्कर जाधव तसेच महाविकास आघाडीतील नाना पटोले, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याशी तरी चर्चा करायची तसदी…
केशव उपाध्ये म्हणाले की, "आता जनसुरक्षा कायद्याबाबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आक्षेप घेत आहेत. खरंतर आक्षेप घेण्यापूर्वी किमान त्यांच्या पक्षाच्या अंबादास दानवे, भास्कर जाधव तसेच महाविकास आघाडीतील नाना पटोले, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याशी तरी चर्चा करायची तसदी घ्यायची, की, या लोकांनाही काहीच कळत नाही असे ठाकरे-राऊत यांना वाटते?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "या विधेयकावर संयुक्त समितीत चर्चा झाली त्यात ही सर्व मंडळी होती. तिथेच या विधेयकाचा मसुदा अंतिम झाला. बरं महाविकास आघाडीच्या लोकांनी आक्षेप घेणारी नोटसुध्दा त्यावेळी दिली नाही. राहता राहिला प्रश्न ६४ संघटनाची यादी. ही यादी युपीए सरकार असताना २०१२ मध्ये संसदेच्या पटलावर ठेवली होती. राऊत हे खासदार आहेत त्यांनी ती पहावी. नसेल तर त्यांनी नक्की पाठवून द्यायला तयार आहे," असेही केशव उपाध्ये म्हणाले.