राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
10-Jun-2025
Total Views | 11
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १० जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे :
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी विधिमंडळ अधिवेशनात त्यासंबंधीचे विधेयक आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय करून विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
यासोबतच राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६ हजार २५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची तर बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही ८ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.