महत्वाची बातमी! मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण!
10-Jun-2025
Total Views |
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण व्हावे यासाठी जनहित याचिका (पीआयएल) वकिल मॅथ्यूज जे नेदुम्पारा यांनी दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देत, दि. १० जून, मंगळवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने काही खंडपीठांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी कोर्टने सहमतीचा ठराव मंजूर केला आहे, असे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी सांगितले.
मुख्य न्यायाधीश आराधे आणि न्या. संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने म्हटले की, “न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात आहे. त्यात आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे. काही न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी पूर्ण न्यायालयाने ठराव मंजूर केला आहे. यात पहिले पाच न्यायालये थेट प्रक्षेपित केली जातील.”