डॉ विंदा भुस्कुटे लिखित डोळ्यांवर बोलू काही पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

    10-Jun-2025   
Total Views |




कल्याण : या पुस्तकाला शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड म्हणाले की , " डॉ विंदा भुस्कुटे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या छोटेखानी पुस्तकात डोळे या विषयावरील वेगवेगळ्या पैलूंवर मुलांना समजेल अशा शब्दात प्रकाश टाकण्यात आला आहे. मुलांप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी या पुस्तकाचे वाचन करून दृष्टीदान या विषयाचा प्रसार करावा."

या प्रसंगी पुस्तकाच्या लेखिका व शिक्षण सेवाव्रती डॉ विंदा भुस्कुटे , अवयवदान चळवळीचे प्रसारक व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे पदाधिकारी नागराजन अय्यर, जायंटस ग्रुप ऑफ कल्याण मेनचे सुरेशभाई सूचक , कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव व संपादक हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते. अखंड वाचन यज्ञचे प्रणेते व अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन आणि जायंटस ग्रुप ऑफ कल्याण मेन आणि सहेली ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले आहे. याच मालिकेमध्ये वर्षभरामध्ये रक्तदान, अवयवदान , देहदान या विषयांवर पुस्तके काढण्याचा संस्थेचा मानस आहे. सदर पुस्तकावर आधारित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व विजेत्यांना अखंड वाचन यज्ञ उपक्रमात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व विनामूल्य ई पुस्तक प्राप्त करण्यासाठी हेमंत नेहते ८७७९६४४९९२ यांच्याशी संपर्क साधावा.