अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँकांचा एनपीए 'समाधानकारक' नाही - शक्तिकांता दास यांची स्पष्टोक्ती
मुंबई: मुंबईतील आरबीआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात युसीबी( Urban Cooperative Bank) च्या संचालकांना उद्देशून बोलताना अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँकेवरील एनपीए संदर्भात आपली ' समाधानकारक ' नसल्याची नाराजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी व्यक्त केली आहे. या बँकांना शक्तिकांता दास यांनी गव्हर्नन्स स्टँडर्ड्स वर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः एनपीए ( Non Performing Assets) ८.७ टक्यांवर गेला असताना त्यांनी हे वक्तव्य केले. क्रेडिट रिस्क, गव्हर्नन्स या विषयावर भर देण्याचा सल्ला दिला आहे.
३० ऑगस्टला त्यांनी कार्यक्रमात दास यांनी आपले संबोधन यावेळी भाषण केले.अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँकावरील वाढती आव्हाने, नफ्यातील घट,वाढलेला एनपीए ,पंजाब आणि महाराष्ट्र बँकचे घडलेले प्रकरण या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. लोकांच्या कष्टाचे पैसे डिपोझिट म्हणून येत असल्याने त्याला अग्रक्रम दिला गेला पाहिजे. गरीब, मध्यम वर्ग, निवृत्त ज्येष्ठ नागरिक हे याचे प्रमुख घटक असतात. यामुळे बँक ही मुदतठेवीवर चालत असल्याची आठवण त्यांनी या अधिकाऱ्यांना बोलताना करून दिली.
GNPA, Capital Adequacy Ratio हा समाधानकारक नसल्याचा इशाराही शक्तिकांता दास यांनी यावेळी दिला.