मायक्रोसॉफ्टचे 'फास्टेस्ट कोडर' हॅकाथॉन; मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये हॅक करण्यासाठी विशेष आमंत्रण
13-Jun-2023
Total Views | 82
मुंबई : जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात 'फास्टेस्ट कोडर' हॅकाथॉन लाँच केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GitHub Copilot सह विकासकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्ट इंडियाने ID8NXT च्या भागीदारीत "फास्टेस्ट कोडर" डिजिटल हॅकाथॉन सुरू केली आहे. कंपनीने सांगितले की, हॅकाथॉन भारतातील तंत्रज्ञान विकासक आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्सना खुली करण्यात आली असून यातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे, यात आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीसाठी 'GitHub Copilot'ने वापरून त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
दरम्यान, "हा कार्यक्रम तंत्रज्ञान विकासक आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांना GitHub Copilot वापरून, वास्तविक-जगातील समस्या सोडवणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपाय तयार करण्याची संधी देईल," मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. तसेच, कंपनीच्या म्हणण्यानुसार, हॅकाथॉन विकसकांना गिटहब कोपायलट वापरून पाच थीमवर उपाय तयार करण्याची संधी देते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मायक्रोसॉफ्ट इंडियाने सांगितले, "आम्ही भारतातील विकसक समुदायाला सशक्त आणि सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचा उद्देश प्रगत संसाधने आणि साधने प्रदान करणे आहे जे विकासकांना नावीन्य आणू शकतात आणि तंत्रज्ञानाचे भविष्य घडवू शकतात," हिमानी अग्रवाल, कंट्री हेड, Azure, मायक्रोसॉफ्ट म्हणाल्या.
'फास्टेस्ट कोडर' हॅकाथॉन म्हणजे काय
यात सहभागींना पाचपैकी एक समस्या विधान सोडवावे लागेल, जे आव्हानाच्या एक तास आधी उघड होईल. पहिल्या १०० नोंदणीकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये हॅक करण्यासाठी विशेष आमंत्रण देखील मिळेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे, "AI द्वारे विकासक उत्पादकता वाढवण्यावर भर देऊन, हे हॅकाथॉन GitHub Copilot ची शक्ती आणि विकासकांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यात मदत करण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकते," अग्रवाल पुढे म्हणाले.