मुंबई: नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही विश्वाचे आतापर्यंतचे सर्वात खोल दृश्य आहे. यामुळे विश्वाबद्दलचे दृष्टीकोन नुकतेच विस्तारले आहे: नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही आकाशगंगांनी भरलेली आहे. सोमवारी दि. ११ रोजी या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या इव्हेंटमध्ये रिलीझ केलेली "डीप फील्ड" प्रतिमा, ही ताऱ्यांनी भरलेली आहे. या छायाचित्राच्या अग्रभागी प्रचंड आकाशगंगा आहेत. “आम्ही मानवतेला ब्रह्मांडाचा एक नवीन दृष्टिकोन देणार आहोत. "आणि हे असे दृश्य आहे जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते." असे नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या महिन्यात एका ब्रीफिंगमध्ये पत्रकारांना सांगितले होते.
जो बायडन यांनी शेअर केला फोटो जो बायडन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, वेब स्पेस टेलिस्कोपमधील हा पहिला फोटो विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील एक ऐतिहासिक क्षण दर्शवतो. हा खगोलशास्त्र, अवकाश संशोधनासाठी ऐतिहासिक क्षण आहे. तसेच हे अमेरिकेसाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी आहे. '