निरोगी मनाच्या आड येणारा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे आपला अहंकार. म्हणूनच या अहंकाराला आपला ‘रिपु’ म्हणजेच ‘शत्रू’ असे संबोधले गेले आहे. या अहंकारामुळे आपण वास्तवापासून स्वत:ला दूर नेत असतो. आपल्या अहंकारामुळे आपण आपल्यावर झालेली कुठलीही टीका जराही सहन करू शकत नाही. इतरांना आपल्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका आढळू शकतात, हे आपण जेव्हा मान्यच करायला तयार होत नाही, तेव्हा त्याला ‘अहंकार’ असे म्हणतात. बरेचदा इतरांकडून येणारी प्रतिक्रिया आपल्याला आरसा दाखविण्याचे कार्य करत असते. परंतु, आपले काही चुकते हेच अहंकारामुळे आपल्याला द़ृष्टीस पडत नाही. आपण जे करतो तेच बरोबर आणि इतर जे करतात तेच चुकीचे, असा समज अहंकारी माणसाचा होतो.
यालाच ‘भ्रम’ म्हणतात. स्वत:च्याच नजरेत स्वतःलाचमोठेपणा देत बसणे हाच तो भ्रम. या भ्रमामुळे आपले फार नुकसान होत असते. आपण स्वत:लाच मोठे समजायला लागल्यामुळे आपल्या यशासाठी लागणार्या मेहनतीचे तसेच समोरील अडथळ्यांची तीव्रता आपल्याला कळत नाही व त्यामुळे आपली तयारी होत नाही. याचाच अथर्र् असा की, आपण वास्तवापासून दूर जातो व चुकीचा समज डोक्यात ठेवतो. यालाच 'false conception of reality असे म्हणतात व यालाच मानसशास्त्रात 'delusion' असे म्हणतात. म्हणजेच 'इगो' हे एक 'delusion आहे आणि 'delusion is a disease' म्हणजे भ्रम ही रोगाची अवस्थाच आहे.
माझ्या ओळखीचे एक विचारवंत होते, ते नेहमी त्यांचे विचार त्यांच्या लेखांमधून, कथांमधून व ब्लॉगसमधून मांडत असत. त्यांच्या लेखाला किंवा विचारांना जे लोक अनुमोदन देत किंवा त्यांची वाहवा करत असत, त्याचे फार अप्रूप होते. परंतु, जर त्यांच्या विचारांना कोणी जर चुकीचे म्हटले किंवा त्यांचे विचार कोणाला पटले नाहीत व मतभेद झाले, तर हे विचारवंत त्या माणसाचा सरळ सरळ अपमान करायचे, त्याला अद्वातद्वा बोलायचेत. बरं इतरांच्या चुका काढण्यात व इतरांना कमीपणा देण्यात हे महाशय सर्दैव पुढे असायचे. या अशा स्वभावामुळे, अहंकारामुळे त्या विचारवंतांचे पुढे अतोनात नुकसान झाले व त्यांची प्रगतीच खुंटली.
म्हणूनच अहंकाराला आपण शत्रू मानतो. कारण, त्यामुळे आपली वैचारिक, तसेच व्यावसायिक, तसेच पारमार्थिक व अध्यात्मिक प्रगती खुंटते व जोपर्यंत या अहंकाराचा कचरा आपण आपल्या अंतर्मनातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत माणसाचे मन निरोगी होत नाही. लेखक 'रायन होलीडे' लिहितात, "If the ego is the voice that tells us we're better than we really are, we can say ego inhibits true success by preventing a direct and honest connection to the word around us...The ways this separation manifests itself negatively are immense, we can't work with other people if we have put up walls. We can't improve the world if we don't understand it ourselves. We can't take or receive feedback if we are incapable of or uninterested in hearing from outside sources."
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)