विद्यार्थिनी असो, नोकरदार महिला अथवा गृहिणी, त्यांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या ताणतणावामुळे आणि आहार-विहाराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. तेव्हा, या समस्यांचे स्वरुप, लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
‘सीताबाईला चाफेकळीला नहाण आले...’ त्या अबोध, अस्फुट कळीला आपल्यात घडणारे बदल हे का होत आहेत, हे मलाच का झाले? आता असे नेहमीच होणार का? इ. अनेेक गोष्टींचा पिंगा तिच्या मनात सुरू असतो, तर घरातील वडिलधार्या स्त्रियांना मात्र असे वाटते की, माझी लाडकी लेक, सून आता मोठी झाली, वयात आली. तिचे शरीर आता अपत्यधारणेसाठी योग्य होऊ लागले. हे जणू दुसर्यांना सांगण्यासाठी ती उत्सुक झालेली असते. आता तिचे शरीर हे सृजनासाठी तयार होऊ लागले आहे. त्या छोट्या शरीरापासूनच पुढे पुन्हा एका नवीन छोट्या जीवाची उत्पत्ती होणार आहे.
आयुर्वेदात स्त्रियांना त्यांच्या वयानुसार पुढील संज्ञा दिलेल्या असतात-
1) बाला - 1 ते 5 वर्षे
2) मुग्धा - 5 ते 11
3) प्रौढा - 11 ते 26
तसेच स्मृतिग्रंथातही वयाच्या अवस्थेनुसार
अष्टवर्षा भवेत् गौरी, दशवर्षा च कन्यका।
सम्प्रापि द्वादशे वर्षे
तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडविणारा असा हा टप्पा येत असतो, तो म्हणजे तीची पाळी सुरू होणे.
पाळी येण्याचे वय साधारणपणे 12 ते 16 वर्षे आहे. क्वचितप्रसंगी 18व्या वर्षीसुद्धा पाळी सुरू होते. सध्या मात्र हे वय नवव्या-दहाव्या वर्षी, तर क्वचित आठव्या वर्षी पाळी सुरू झालेल्या छोट्या मुली बघण्यात आल्या आहेत. एवढ्या लवकर पाळी येण्यामागे अनेक सामाजिक, मानसिक, आर्थिक कारणे आहेत, असे लक्षात येईल. घरात सतत चालू असलेला ‘मॅड बॉक्स’वरील नंगा धिंगाणा, ‘आम्हाला परवडते’ म्हणून केवळ चिकन, पिझ्झा, बर्गर ते रोज बदामाचा, खारकांचा रतीब, या आहाराने शरीर नको तेवढे पुष्ट होते. मानसिकदृष्ट्या विकृत होते व त्या छोटीला काहीही कळत नसताना या आर्तवचक्रात लहान वयातच अडकायला होते.
तसेच पाळी सुरू होण्यावर देश, काल, जात इ. अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. जसा की, उष्ण प्रदेशात मुलींना लवकर पाळी येते.
मासि मासि रजः स्त्रीणाम्।
रसजः स्रवति त्र्यहम्॥
शशासृक् प्रति मं यत्रु यद्वा लाक्षारसोपमम्।
तदार्तव प्रशंसन्ति यद्वासो न विरंजयेत्॥
आयुर्वेदानुसार मासिक पाळीचा हा विचार अतिशय स्पष्ट आहे. दर महिन्याला स्त्रीच्या शरीरातून तीन दिवस जो रक्तस्राव होतो, त्याला ‘प्राकृत मासिक रजःप्रवृत्ती’ म्हणतात. या स्रावाला वास नसावा. त्याचा रंग आळत्याप्रमाणे लाल असावा. त्याची द्रवता सशाच्या रक्ताप्रमाणे असावी. तसेच ते रक्त गाठीच्या स्वरूपात नसावे. कपड्यावर डाग पडल्यास पाण्याने धुतल्यावर तो डाग नाहीसा व्हावा. तसेच या स्रावाच्या वेळी शरीरात वेदना होऊ नये. आपण मलमूत्र विसर्जन करताना जरा त्रास होत नाही, इतक्या सहजरित्या हा स्रावही शरीराबाहेर पडला, तर त्याला ‘प्राकृत मासिक रजःस्राव (पाळी)’ असे म्हणता येते. यापैकी एक जरी लक्षण भिन्न असले, तर शरीरातील कोणत्या तरी दोषाची विकृती असावी, असे लक्षात येते.
आधुनिक शास्त्रानुसार विचार करता, गर्भाशय, बीजवाहिन्या-2, बीजांडकोक्ष अशी स्त्रीची प्रजननसंस्था असते. मासिक पाळी आल्यानंतर 12 ते 16 किंवा 18 दिवसांमध्ये बीजांडकोश (र्जींरीू) मधून परिपक्व झालेले बीज (र्जीर्ीां) बाहेर पडते. ते बीजवाहिनी नलिकेद्वारे गर्भाशयाच्या अस्तरावर येते. त्यावेळी संबंधांमुळे आलेल्या शुक्रजंतुशी या बीजाचा संयोग झाला, तर गर्भशयाच्या अंत:स्तरावर तो गर्भ रुजतो, पण तसे न झाल्यास परत आठ ते दहा दिवसांनी गर्भाशयातील अंतस्तर सुटून बाहेर येते; रक्तस्राव होतो. यालाच ‘मासिक पाळी’ किंवा ‘रजःस्राव’ म्हणतात.
हा चार ते पाच दिवसांनंतर निसर्गतः बंद होतो. तो तसा झाला नाही, तर पाळीसंबंधी समस्या सुरू होतात.
1) Delayed menses amenorrhea - आशपेीीहशर अनार्तव
2) Dysmenorrhoea- कष्टार्तव
3) Menorrhagia - अत्यार्तव
4)Metrogghagia - असामान्य गर्भाशयाचा रक्तस्त्राव
5) Less flow od menses - अल्पार्तव
मुलींची पाळी सुरू झाल्यावर सुरुवातीला काही महिने काही मुलींची पाळी ही उशीरा येते व काही महिन्यांतर ती नियमित होते. त्यासाठी शक्यतो कुठल्याही औषधोपचाराची गरज नसते. आजच्या ताणतणावाच्या वातावरणाचा स्त्रीच्या मनावर व शरीरावरही परिणाम होत असतो.
ताणतणाव-काळजी, नैराश्य या विविध भावनांमुळे मेंदूतील कूिेींहरश्रर्राीी मधून छशसरींर्ळींश र्खािीश्रीश मिळतात. त्यामुळे स्त्रीच्या पिट्युटरी ग्लॅन्डमधून घशाजवळील थायरॉईड ग्रंथीमधून मासिक पाळीच्या कालावधीत मासिक पाळीच्या स्रावात फरक घडून येतात.
स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्स करत असलेले नैसर्गिक कॅल्शियम शरीरात तयार करणे, रक्त पातळ राहणे, गुठळी होऊ नये, रक्ताभिसरण चांगले व्हावे इ. कार्यातही असमतोल निर्माण होतो. त्यामुळे हाडांचे आजार, सांध्याचे आजार इ. होऊ शकतात.
1) आशपेीीहशर अनार्तव - मासिक पाळी सुरू झाल्यावर सुरुवातीला किंवा चाळीशीनंतरही शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, शारीरिक तात्पुरत्या दोषामुळे तसेच आजकाल बर्याच मुलींमध्ये परीक्षेच्या ताणामुळेही, अभ्यासासाठी केलेल्या जागरणामुळे मानसिक ताण निर्माण होतो आणि नैराश्यामुळे पाळी पुढे जाते. त्यामुळे पचनही बिघडते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पाळी पुढे जाते. चेहरा निस्तेज होतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
काही स्त्रियांना अति थंडीमुळे, तापामुळे पाळी पुढे जाते व त्यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होते. खूप राग चिडचिड होते. ओटीपोटात जड वाटते. पोटात दुखते. काही स्त्रियांना सकारण-विनाकारण भीतीमुळे पाळी पुढे जाते, तर थायरॉईडचा त्रास असेल, तरी पाळी उशिरा येते. पपई, खरवस, शेवग्याच्या शेंगांची भाजी, काळे तीळ+गुळ, अळीव यांच्या वापराने पाळी सुरू होते
.
2) कष्टार्तव - मासिक पाळी सुरू झाल्यावर गर्भाशयाची आकुंचन-प्रसरणाची क्रिया होते. त्यामुळे पोटात दुखणे, कंबर, पाय दुखणे असे त्रास होतात. बर्याच स्त्रियांना मासिक पाळीचा स्राव योग्य प्रमाणात सुरू झाला की पोटात दुखणे थांबते. पण, गर्भाशयातील संपूर्ण स्राव शरीराबाहेर न जाता, थोडा स्राव गर्भाशयात साठून राहिल्यास कालांतराने गाठी होतात. चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने सोनोग्राफीद्वारे आपला चेकअप करून घेणे हिताचे असते. काही स्त्रियांना पोटात असह्य दुखते की त्या अक्षरशः गडाबडा लोळतात. कंबरेत दुखते. पाय दुखतात. पोटर्यांत गोळे येतात. काही स्त्रियांना रजःस्राव हा काळसर वर्णाचा होतो. स्रावाला उग्र दर्प असतो किंवा कधी कधी नकोसा वाससुद्धा असतो, तर काही स्त्रियांना या काळात मळमळणे, उलट्या होणे, डोके दुखणे, जेवल्यावर लगेच शौचाला होणे, हे त्रास होतात. पचनशक्ती या काळात मंदावते.
पथ्य - मासिक पाळी सुरू झाल्यावर आहारात उष्ण पदार्थ खाऊ नयेत. तसेच आजकालचे फास्ट फूड, जंक फूड नावाखाली येणारे सर्व पदार्थ पिझ्झा, बर्गर, पाव-भाजी, पाणीपुरी हे सर्व टाळावे. चायनीज पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.
- गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे.
- पोटाला, पायाला हलक्या हाताने तेल लावावे.
- गरम पाण्यात (1 कप) पाव चमचा हिंग घालून प्यावा.
एक चमचा बडिशेप, अर्धा चमचा बाळंतशोपा, पाव चमचा ओवा + 1 कप पाणी उकळवणे, पाऊण कप राहिला की दोन वेळा जेवणापूर्वी घेणे. पाळीच्या तारखेच्या आधी दोन ते तीन दिवसांपासून सुरुवात, असे तीन महिने घेणे. पोटदुखी थांबते.
अति रजःस्राव (असृग्दर) चशपेीीहसळर - स्त्रीचा प्राकृत रजःस्राव हा चार ते पाच दिवसांनंतर थांबला पाहिजे. त्या स्रावाचे प्रमाण हे प्राकृतपेक्षा अधिक असेल, तर त्याला ’चशपेीीहसळर’ म्हणतात. हा स्राव जर जास्त दिवस सुरू राहिला, तर त्याला म्हणतात. प्राकृत रजःस्रावापेक्षा हा स्राव लालसर पातळ होतो. तर कधी कधी गडद लाल रंगाचा, काळपट तपकिरी रंगाचासुद्धा असू शकतो. काही स्त्रियांना हा स्राव गाठीयुक्तसुद्धा होतो. त्यावेळी पोटात, कमरेत खूपच दुखते.
मासिक पाळीचा त्रास आठ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस होणे, अधिक स्राव होणे यामुळे स्त्रीला विविध त्रास होतात. याची कारणे अनेक असतात.
1) गर्भनलिकादाह
2) गर्भाशय उलटा
3) गर्भशय्या जाड होणे
4) गर्भाशयात गाठी असणे
या स्त्रियांना अति रक्तस्रावामुळे अतिशय थकवा येतो, डोळे खोल जातात, रक्त कमी झाल्यामुळे हात-पाय गार पडतात, चक्कर येते, क्वचितप्रसंगी बेशुद्धही पडतात. याचे कारण गर्भाशयातील अंतस्तराचा दाह एपवेाशीींळेीळी हेही कारण असू शकते.
अनेक दिवस स्राव चालू राहिल्याने मूत्रमार्गाला, योनीमार्गाला खाज, आग होणे, हे त्रास होतात. तसेच, अनेक दिवस सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळेसुद्धा त्याची अॅलर्जी होऊ शकते व त्यामुळेसुद्धा खाज येणे, आग होणे असे त्रास होऊ शकतात.
ङशीी ऋश्रेु जष चशपषशी - अल्प रजःस्राव मासिक पाळीचा स्राव जर कमी प्रमाणात, कमी दिवस होत असेल, तर त्याचीसुद्धा चिकित्सा करणे गरजेचे आहे. याला ’जश्रळसेाशपेीीहशर’ म्हणतात.
1) शरीरात रक्त कमी असणे
2) शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य नीट नसणे.
3) थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट नसणे.
वरील कारणासाठी स्त्रीच्या रक्ताच्या कइ साठी, हार्मोन्ससाठी तसेच थायरॉईडसाठीच्या तपासण्या करणे गरजेचे ठरते.
* अल्ट्रासोनोग्राफी करून तिच्या अंडाशयातून अंडे व्यवस्थित स्रवते आहे ना, हेसुद्धा बघणे गरजेचे ठरते. र्जींरीळशी मध्ये जर लूीीं असल्या झउजऊ तर स्त्रीला पाळी ही दीड-दोन, तीन-तीन महिनेसुद्धा येत नाही.
* पाळी जाण्याच्या वयातसुद्धा मध्ये पाळीला अंगावर कमी जाते. तसेच पाळी दोन-तीन महिन्यांनीसुद्धा येते. यावेळी र- जननेंद्रियात कोरडेपणा इ. त्रास होतात.
* आपण अनुसरलेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे चुकीच्या आहार-विहारामुळे जसे की गुरुविदाही, परस्परविरोधी भोजन, मद्याचा वापर, नॉनव्हेजचे, अति तिखट, विदाही आहारामुळे वरील अनेक त्रास होऊ शकतात.
* विहार : सतत टु-व्हीलर वरून प्रवास, खेळाडू मुलीचा सतत सराव (खेळाचा)पाळीच्या दिवसांत वाटेल तशा उड्या मारणे, नेहमी धावून गाडी, बस वगैरे पकडणे. (टीव्हीवर जाहिरातीत दाखविल्या जाणार्या गोष्टी या त्या स्त्रीचे पुढील आरोग्य नक्कीच धोक्यात आणू शकतात.) आजकाल कॉलसेंटरसारख्या कराव्या लागणार्या रात्रीच्या नोकर्यांमुळे त्यांचे नैसर्गिक जीवनचक्रच आपण उलटे फिरवतो. पण, त्याचे परिणाम आपल्या शरीराला नक्कीच भोगावयास लागतात.
* मानसिक विकार (क्रोध, शोक, भय): आदींनी मनाला येणारी उद्विन्नता- उपवास, कुपोषण, अभिघात, गर्भपात, अतिमैथुन सतत भारवहन (ओझे उचलणे), संक्रामक रोग (गोवर, जर्मन मिसल्स इ.), गर्भाशयाचे विकार (रक्त गुल्म, गर्भाशयगत रक्ताधिक्य, अनेक प्रकारची अर्बुद) इ. अनेक कारणांना असृग्दराची उत्पत्ती व वृद्धी होते.
* तसेच यात सामान्यपणे सार्वदैहिक लक्षणे आढळतात. अंगमर्द, जननांगात वेदना, हातापायाच्या तळव्यांची आग होणे, प्रलाप , चिडचिड होणे, शिरःशूल, कंप इ. लक्षणे होतात.
चिकित्सा : वर बघितलेल्या अनेक समस्यांवरती त्यानुसार वेगवेगळी चिकित्सा करावी लागते. तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी.
पथ्य म्हणून किंवा औषधाशिवाय आपण पाळीच्या समस्या सुधारू शकतो. यासाठी योग्य आहार (कर्बोदके+प्रथिनांचा योग्य वापर)
* सोयाबीन, अळीव, बाळंतशोपा, ओवा, तीळ, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोलीचा आहारात वापर
* साजूक तूप, गोड ताक, साय काढलेले दूध, पनीरचा वापर
* रोज किमान बारा सूर्यनमस्कार, तसेच योगासनांमध्ये सर्वांगासन, हलासन, पवनमुक्तासन, शलभासन, भुजंगासन, पोटावरील व कमरेवर अधिक चरबी असल्यास तेथे व्यायाम होणारी आसने.
* सकाळी लवकर उठणे. रात्री लवकर झोपणे. दिवसा न झोपणे.
* औषधामध्ये अशोकारिष्ट लोध्रासव पचंगारिष्ट, दशमूूलारिष्ट, कुमारी आसव-न.1
* चंद्रप्रभा, चंद्रकला आरोग्यवर्धिनी, ओलबद्ध रस
* वरील औषधे वेगवेगळ्या आजारांवर आहेत. ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावीत व समस्यामुक्त व्हावे!
(लेखिका MA (योगशास्त्र) B.A.MS आहेत.)
डॉ. अरुणा टिळक
9821478884