ज्योती मल्होत्रा एनआयएच्या ताब्यात

    20-May-2025   
Total Views |

Jyoti Malhotra arrested by NIA

नवी दिल्ली  : विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले आहे.
ज्योतीची चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक सोमवारी हिसारला पोहोचले होते. यानंतर मल्होत्रास ताब्यात घेऊन चंदीगडला नेण्यात आले. ज्योतीची तिच्या दहशतवादी संबंधांबद्दल चौकशी केली जाईल. यासोबतच जम्मू इंटेलिजेंस युट्यूबरची चौकशी देखील करणार आहे.

यापूर्वी, युट्यूबर ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन करण्यात आले होते. त्यांचे १.३९ लाख फॉलोअर्स होते. रविवार, १८ मे रोजी रात्री हिसार पोलिसही ज्योतीच्या घरी पोहोचले. तेथे झडती घेतल्यानंतर काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हिसार पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती काश्मीरला गेली होती. ती पहलगाम, गुलमर्ग, दल सरोवर, लडाखमधील पँगॉन्ग तलाव येथे गेली. पँगाँग हे चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) लागून आहे. तीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर या ठिकाणांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.