"कोल्हापुरात होणार का पंढरपूरची पुनरावृत्ती?"

भाजपतर्फे सत्यजित कदम यांना कोल्हापुरात उमेदवारी

    19-Mar-2022
Total Views | 349

Satyajit Kadam
 
 
 
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्यजित शिवाजीराव कदम यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. "पंढरपूर येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असून इतर पक्षांचा तेव्हा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे यावेळीही कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपच जिंकून येणार.", असा विश्वास यावेळी सत्यजित कदम यांच्याकडून देण्यात आला.
 
 
 
मविआ सरकारकडून मात्र या जागेवरून काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक एकत्रच लढवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला शिवसेनेतील काही मंडळींकडून तसेच शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121