‘कोरोनामुक्ती’चा ‘युएई पॅटर्न’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2021   
Total Views |

covid free_1  H

कोरोना आटोक्यात आला आहे आणि संपूर्ण देश ‘अनलॉक’च्या प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा पूर्णपणे सामान्य स्थितीत परतला आहे. भारतही एक दिवस या दिवसापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करूयात आणि युएईने इथवर येण्यासाठी काय प्रयत्न केले, याचा थोडक्यात आढावा घेऊया.



कोरोनाचे संकट भारतासह जगभरात अजूनही कायम आहे. परंतु, संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई या देशाने आपली कोरोना नियंत्रणात जी छाप जगावर पाडली आहे, त्यातून शिकण्यासारखे भरपूर आहे. कारण, या देशातील कोरोनाची परिस्थिती आता चांगलीच सुधारली आहे. कोरोना आटोक्यात आला आहे आणि संपूर्ण देश ‘अनलॉक’च्या प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा पूर्णपणे सामान्य स्थितीत परतला आहे. भारतही एक दिवस या दिवसापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करूयात आणि युएईने इथवर येण्यासाठी काय प्रयत्न केले, याचा थोडक्यात आढावा घेऊया.


कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत जेव्हा आपण युएईचा विचार करतो, तेव्हा इतर देशांच्या तुलनेत हा देश नक्कीच उजवा ठरतो. कोरोनावर नियंत्रण मिळवत असताना सरकारने ज्या ज्या सूचना केल्या, त्याचे तंतोतंत पालन इथल्या नागरिकांनी केले. ही लढाई मानसिक आणि स्थानिक पातळीवर जिंकण्यात या देशाला यश मिळाले आहे. आजही कोरोनामुक्त झाल्यानंतर देशातील नागरिक तसूभरही आपले कर्तव्य विसरलेले नाहीत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि मास्क वापरण्याचे नियम काटेकोरपणे पाळत आहेत.

युएईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वप्रथम शाळा आणि धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेत न येणारी ठिकाणेही पूर्णतः बंद होती. ‘लॉकडाऊन’ काटेकोर पाळण्यात आला. संपूर्णपणे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. युएईमध्ये ‘लॉकडाऊन’चा जरासाही फटका बसला नाही. कारण, तिथे सर्व प्रकारच्या ‘ऑनलाईन सेवा’ अगदी सुरळीत होत्या. जितके रुग्ण वाढले, तितक्या सर्व रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने उचलली होती. ‘हॉटस्पॉट’ नियंत्रण असो वा कोरोना चाचण्यांवर भर देण्याबद्दलची तयारी, सर्व जबाबादार्‍या तिथल्या प्रशासनाने अगदी चोखपणे बजावल्या. ‘क्वारंटाईन’ करण्यासाठी ‘फाईव्ह स्टार’ रुग्णालयांमध्ये नागरिकांची सोय करण्यात आली होती. वेळेत जेवण आणि औषधे मिळतील याची काळजी घेतली जात होती. ‘सोशल मीडिया’वर दुबईतील ‘क्वारंटाईन’ केंद्रांचे असे व्हिडिओ प्रसारित झाले होते. तिथेही रमजानमध्ये दहापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी होती. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍याला दोन लाख, तर सहभागींना एक लाख दंड ठोठावण्यात आला होता.

दुबईत ११ दुकाने सील करण्यात आली होती. जर रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतरही रुग्णालयात दाखल व्हायला नकार देत असेल, तर त्याच्यावर दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. विलगीकरणात नियम मोडणार्‍यांवरही अशीच कारवाई केली जात होती. कोरोना चाचणी करणे, कोरोनामुक्त राहणे, हेच ध्येय नागरिकांनी ठेवले. तिथली जनता याबद्दल जागरूक होती. आजही भारतात अनेक जण कोरोना चाचणी करण्यासाठी धजावत नाहीत. पण, युएईमध्ये कोरोना चाचणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघी ९७.७ लाख रुग्णसंख्या असलेल्या या देशाने स्वतःच्या मनातून कोरोनाची भीती चांगल्या अर्थाने घालवली. लोकसंख्येच्या चारपट कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांची संख्या ही ४.३ कोटी इतकी होती. लसीकरणाबद्दलही हेच गुणोत्तर युएई पुढे कायम ठेवणार आहे.

इथल्या रुग्णांंवर आजही मोफत उपचार केले जातात. रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर त्याच्या सर्व चाचण्या वेळेत पूर्ण केल्या जात. रुग्णाला ‘क्वारंटाईन’ करताना ‘ऑक्सिमीटर’, औषधे आणि एक बॅण्ड सोबत दिला जातो. जेणेकरून रुग्णावर लक्ष ठेवता येत होते. काही भारतीय तिथे गेल्यावर कोरोना ‘पॉझिटिव्ह’ झाले होते. त्यांचीही व्यवस्था तिथल्या प्रशासनाने उत्तमरीत्या केली. कोरोना महामारीतही या रुग्णांना भारतीय पारंपरिक जेवण उपलब्ध करून देण्यात आले, ही तिथल्या प्रशासनाची विशेष संवेदनशीलता होती.या सगळ्याचा ऊहापोह करताना तिथलंच काय ते संगळं चांगलं आणि भारतात परिस्थिती वाईटच, हे सांगण्याचा उद्देश नाही. पण, ठरवलं तर अशक्य भारतालाही काहीच नाही. कारण, भारतानेही या देशाला गरज असताना मदत केली आणि युएई आता संकटात मदत करून त्याची परतफेडही करतोय. फक्त कोरोनाला हरवण्यासाठी स्वयंशिस्तीचा मार्ग मार्ग नागरिकांनी अवलंबावा. कोरोना चाचणी करताना कचरू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, हीच अपेक्षा.

@@AUTHORINFO_V1@@