चालू द्या तुमची नाटक कंपनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |

rahul gandhi_1  
राहुलजी आपल्या महाराष्ट्रातील यारीदोस्तीबाबत नाराज दिसतात. सत्तेचे अखंड ऐश्वर्य भाळी दिले. मात्र, भार्येने हिंग लावून विचारू नये, असे काहीसे त्यांचे झाले आहे. त्यामुळेच की काय ते म्हणाले, “आम्ही फक्त महाराष्ट्रात समर्थन दिले आहे, तिथे निर्णय घ्यायचा आम्हाला अधिकार नाही.”

जैसै मैं करता हूं, वैसे तुम करते हो
ये तो बताओ की तुम मेरे कौन हो?
(चाल, ‘जहा मै जाती हूं वही चले आते हो’ या गीताची...)
सध्या आपल्या पिताश्री राजीव गांधींसारखे दिसण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी यांना महाराष्ट्र राज्यातल्या सत्ताधार्‍यांना उद्देशूनच असे म्हणावेसे वाटत असणार. त्यांना खात्री आहे की, समोरून त्यांना ‘हम आप के है कौन?’ असा प्रतिप्रश्न येणारच नाही. उलट ‘आपकी नजरो ने समझा सत्ता(प्यार की नव्हे) के काबिल मुझे’ हेच गीत ऐकायला येईल. असे असतानाही राहुलजी आपल्या महाराष्ट्रातील यारीदोस्तीबाबत नाराज दिसतात. सत्तेचे अखंड ऐश्वर्य भाळी दिले. मात्र, भार्येने हिंग लावून विचारू नये, असे काहीसे त्यांचे झाले आहे. त्यामुळेच की काय ते म्हणाले, “आम्ही फक्त महाराष्ट्रात समर्थन दिले आहे, तिथे निर्णय घ्यायचा आम्हाला अधिकार नाही.”


आता हे कुणाकुणाला खरे वाटते? काँग्रेस कसलाही हेतू न बाळगता कुणाला समर्थन देईल का? हो पण, एक हेतू काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी उघड केला होता की, मुस्लीम बांधवांना कसेही करून म्हणे भाजपला महाराष्ट्रात रोखायचे होते. आपल्या पारंपरिक मतदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणे काँग्रेसने आपल्या पारंपरिक विरोधक शिवसेनेला समर्थन केले. अर्थात, त्याचा परिणाम उभा महाराष्ट्र भोगतो आहे. असो, तर राहुल गांधी म्हणतात, “आम्ही महाराष्ट्रात काही करू शकत नाही. निर्णय घेऊ शकत नाही.” कालपरवाच पृथ्वीराज चव्हाणही असेच काहीसे म्हणाले होते. याचाच अर्थ महाराष्ट्रात कोरोनाने जे अराजक माजवले, त्याला काँग्रेस जबाबदार नाही, असे या नेत्यांना म्हणायचे आहे का? तसे असेल तर जबाबदार कोण? यासाठीही दिल्ली, बारामती, वांद्रे टप्पयाटप्प्याने बैठका घ्या, रूसव्या-फुगव्याची नाटके करा. त्यासाठी तर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. गंभीर परिस्थितीमध्ये तन-मन-धन अर्पून जनतेचे काम करण्यासाठी थोडी तुमचे तिघाडी सरकार आहे? नसत्या उठाठेवी करत मनोरंजन करणे हेच काम. त्यात कोणती कमी आणू नका. चालू द्या, तुमची नाटक कंपनी...
बेरोजगारांच्या नाकावर टिच्चून!
घाबरायचे नाही, कारण आता केरळ राज्यातील डॉक्टर्स आणि परिचारिकांना आपल्या राज्य सरकारने आमंत्रण दिले आहे. इथे आल्यावर त्यांना भरघोस वेतन मिळणार आहे. डॉक्टर्सना दोन लाख वेतन आणि परिचारिकांना 30 हजार रुपये पगार. अर्थात, संविधानानुसार देशाचा नागरिक देशात कोणत्याही राज्यात जाऊ शकतो, रोजीरोटी कमाऊ शकतो. त्यामुळे केरळ राज्यातले डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्या येण्याला विरोध नाही. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र नर्स फेडरेशननेही विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रात हजारो परिचारिका कामाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण घेऊनही त्यांना नोकरी नाही. त्यांना नोकरी न देता, केरळहून येणार्‍या परिचारिकांना नोकरी देणे, हा महाराष्ट्रातील परिचारिकांवर अन्याय आहे. या अन्यायविरूद्ध फेडरेशनने आवाज उठवण्याचा निश्चय केला आहे.
अर्थात, फेडरेशनचे म्हणणेही खरेच आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ज्या परिस्थितीमध्ये केरळहून परिचारिका बोलावल्या आहेत, ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेचे खच्चीकरण करण्यासारखेच आहे. पुरोेगामी आणि सर्वच बाबतीत प्रगतिपथावर असणार्‍या महाराष्ट्र राज्यात परिचारिका नाहीत? डॉक्टर नाहीत? की असलेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांवर विश्वास नाही. आजघडीला शीर हातावर घेऊन महाराष्ट्रातले डॉक्टर्स, परिचारिका अगदी वॉर्डबॉय, इस्पितळातले स्वच्छता कर्मचारी कोरोनाशी लढत आहेत. यांच्याच सेवेमुळे महाराष्ट्रातले हजारो कोरोना रूग्ण बरे झालेही आहेत. अपुरी इस्पिताळे, सुविधा नसणे, रूग्णांना इस्पितळात आणण्यासाठी वाहनच उपलब्ध नसणे, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि त्यावर कुणाचाही धरबंध नसणारे राज्य सरकार, यामुळे महाराष्ट्रात जास्त लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्यूला जबाबदार महाराष्ट्रातील डॉक्टर, परिचारिका नाहीत. आज राज्यात गरजूंना परिचारिका, आयाबाई, वॉर्डबॉयचे प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगार द्यायचे काम सरकारने करायला हवे. पण, त्यासाठी नियोजन आणि काम करणार कोण? त्यापेक्षा आयते मिळालेले बरे, असा विचार आयत्या सरकारने केला असावा. असो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आठवले की, राज्यात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी चार दशकांपूर्वी ‘हटाओ लुंगी बजाओ पुंगी’चा नारा दिला होता. आज त्यांच्यासाठीच पायघड्या घालाव्या लागत आहे, तेही महाराष्ट्रातल्या बेरोजगारांच्या नाकारवर अगदी टिच्चून...
@@AUTHORINFO_V1@@