अश्वमेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |


ashwamedh_1  H


आपल्या सर्व पुत्रांना भेटून कुंतीला हर्ष झाला. युधिष्ठिराने सर्वांची विचारपूस केली. विदुरकाकांचीही विचारपूस केली. विदुर फक्त हवेवर राहून तपस्या करत आहेत, असे त्याला कळले. ते आणखीन आत निबीड अरण्यात होते. युधिष्ठिर त्यांना भेटायला तिथे पोहोचला. ते खूप कृश झाले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले


आपल्या प्रियजनांच्या मृत्यूस आपणच कारणीभूत झालो, याचे दु:ख युधिष्ठिराच्या मनात खूप काळ खदखदत होते. धृतराष्ट्र, श्रीकृष्ण यांनी त्याचे सांत्वन करण्याचा यत्न केला व अखेर त्यांना यश मिळाले. युधिष्ठिर चांगला राजा म्हणून लोकप्रियही झाला. यथावकाश श्रीकृष्णाने पांडवांची परवानगी घेऊन तो द्वारकेला परतला. त्याला निरोप देणे पांडवांना खूपच कठीण गेले. परंतु, त्यांनी जड अंत:करणाने त्याला परवानगी दिली व अश्रुपूर्ण निरोप दिला. व्यास महर्षी अनेक वेळा युधिष्ठिराच्या सभेत येत असत. एकदा ते युधिष्ठिराला म्हणाले, "तुम्ही जर अश्वमेध यज्ञ केला, तर तुमच्या पदरी फार मोठे श्रेय पडेल. परंतु, हे कार्य सोपे नाही. त्यासाठी खूप संपत्ती लागते. तुम्ही हिमालयावर जा, तिथे मरुतांनी उतारावर खूप खजिने ठेवले आहेत. ते घेऊन या व अश्वमेध यज्ञ करा." हे ऐकून भीम व अर्जुन खूप खूश झाले. कारण, त्यांना युधिष्ठिराला शोकावस्थेतून बाहेर काढायचेच होते. शिवाय पुन्हा आपला पराक्रम दाखवायची त्यांना संधी मिळणार होती. या नव्या योजनेत युधिष्ठिर पण रमला. अश्वमेध यज्ञासाठी वृष्णी घराण्यातील सर्वजण हस्तिनापुरात आले. शिवाय उत्तरेचे बाळंतपणही जवळ आलेले होते. श्रीकृष्णाला माहिती होते की, हे बाळ जन्मत:च मृत असणार. कारण, अश्वत्थाम्याने ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडले होते. पण, कृष्णाने त्याला पुन्हा जीवंत करू म्हणून प्रतिज्ञा केली होती. विधिलिखित जसे होते तसेच झाले. उत्तरेने मृत अर्भकाला जन्म दिला, पण श्रीकृष्णाने दैवी स्पर्श करून त्याला जीवंत केले. पांडवांनी पुन्हा आनंदोत्सव साजरा केला.

 

युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, "श्रीकृष्णा, मला वाटते तूच हा अश्वमेध यज्ञ करावास." पण, श्रीकृष्णाने त्याचे मन पालटवले व यज्ञासाठी युधिष्ठिरच कसा योग्य आहे, ते पटवून दिले. पांडवांनी अश्वमेध यज्ञासाठी पांढरा शुभ्र घोडा सोडला. बहुतेक राजांनी विरोध केलाच नाही. ज्यांनी केला त्याचा अर्जुनाने लीलया पराभव केला. खंडणी वसूल करून सार्वभौमत्व मिळवले. अशा रितीने थाटामाटात अश्वमेध यज्ञ परिपूर्ण झाला. युधिष्ठिराने सर्व मांडलिक राजांना सन्मानाने वागवले. सारे राजे आपापल्या राज्यात परतले. युधिष्ठिराने १५ वर्षे सुखाने राज्य केले, एक धृतराष्ट्र सोहळा, तर सारेजण खूश व सुखी होते. धृतराष्ट्र मात्र दुर्योधनाच्या आठवणीने व्याकुळ व्हायचा. एके दिवशी धृतराष्ट्राने जाहीर केले की, तो वनात जाऊन राहणार! गांधारी पण त्वरित तयार झाली. हे ऐकून युधिष्ठिर खूप दु:खी झाला. त्याने त्या दोघांचे मन वळवण्याचा यत्न केला, पण तो फोल ठरला. त्या दोघांबरोबर कुंतीनेही वनात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युधिष्ठिरास आणखीनच धक्का बसला. तिने निर्धार केला होता की, राधेयच्या दु:खाला ती कारणीभूत झाली म्हणून प्रायश्चित घेण्यासाठी वनवास पत्करणारच! नाईलाजाने सर्व पांडवांनी धृतराष्ट्र, गांधारी व कुंती यांना विजनवासासाठी निरोप दिला. बरीच वर्षे लोटली व आठवण झाली म्हणून युधिष्ठिर व सर्व पांडव बंधू त्यांना भेटण्यास वनात गेले.

 

आपल्या सर्व पुत्रांना भेटून कुंतीला हर्ष झाला. युधिष्ठिराने सर्वांची विचारपूस केली. विदुरकाकांचीही विचारपूस केली. विदुर फक्त हवेवर राहून तपस्या करत आहेत, असे त्याला कळले. ते आणखीन आत निबीड अरण्यात होते. युधिष्ठिर त्यांना भेटायला तिथे पोहोचला. ते खूप कृश झाले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. एक विलक्षण गोष्ट घडली. विदुरांनी त्याच्यावरती दृष्टी रोखली व आपले सर्व तेज, शक्ती डोळ्यांमधून युधिष्ठिराकडे पाठवली. युधिष्ठिराला जाणवले की, आपण अधिक ज्ञानी व तेज:पुंज होत आहोत. त्याने विदुरांकडे पाहिल्यावर कळले की, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्याने विधुरकाकांच्या और्ध्वदेहिकाची तयारी केली. परंतु आकाशवाणी झाली की, "युधिष्ठिरा, विदुर हे पण तुझ्यासारखेच धर्माचे अवतार होते. त्यांनी आता तुझ्या देहात वास केला आहे. आता विदूर व तू एकच आहात म्हणून त्यांना अग्नी देऊ नकोस." युधिष्ठिर दु:खी होऊन आपल्या भावांकडे परतला. पांडवांनी धृतराष्ट्र, गांधारी व कुंती यांचा निरोप घेतला. दोन वर्षांनंतर नारदमुनी युधिष्ठिरास भेटायला हस्तिनापुरी आले. त्यांनी खूप दु:खदायक बातमी पांडवांना दिली की, वनामध्ये प्रचंड वणवा पेटून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा अंत झाला. संजयही त्यावेळी तिथे होता, पण त्या तिघांनी त्याला तिथून जाण्यास भाग पाडले. संजय हिमालयात तपस्येसाठी निघून गेला, ही बातमी ऐकून युधिष्ठिर मूर्च्छित झाला. सहदेव, भीम, अर्जुन, नकुल पण शोकविव्हल झाले. पांडव पोरके झाले. नारद आणि व्यास मुनी यांनी त्यांचे सांत्वन केले.

- सुरेश कुळकर्णी

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@