सिंधुदुर्गाचा ‘दर्शन’कार

    25-Jun-2025   
Total Views | 97

सिंधुदुर्गची जैवविविधता चोखंदळपणे टिपून त्याआधारे पर्यटनाची सांगड घालणार्या दर्शन प्रदीप वेंगुर्लेकर याच्याविषयी...

पर्यटन आणि निसर्ग संवर्धन यांची सांगड घालणारा हा मुलगा. मालवणसारख्या पर्यटनकेंद्रित ठिकाणी राहूनही त्याने अवाजवी पर्यटनासोबत वाहवत न जाण्याची वाट निवडली. पर्यटन आणि निसर्ग जागृतीचा मेळ साधून तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेचा उलगडा करीत आहे. स्थानिकांना निसर्ग संवर्धनाचे धडे हे उपजीविका देऊनच द्यावे लागतील, असे मत मांडणारा हा तरुण म्हणजे दर्शन वेंगुर्लेकर.

दर्शनचा जन्म दि. १७ फेब्रुवारी १९९१ रोजी मालवण तालुयातील वायरी भूतनाथ या गावी झाला. वेंगुर्लेकर हे मध्यमवर्गीय सर्वसामान्य मालवणी कुटुंब. मालवण शहरातून तारकर्लीला जाताना एक सुंदर उताराचे वळण लागते. त्या वळणावर ऐतिहासिक वारसा असलेले वेंगुर्लेकरांचे घर. या घरातले वातावरण आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा जपणारे. दर्शनचे प्राथमिक शिक्षण हे गावातील प्राथमिक शाळेतच झाले. लहानपणीच त्याचे प्राण्यांसोबत सहृद नाते तयार झाले होते. पुढे ‘नॅशनल जिओग्राफिक’ यांसारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून वन्यजीवांप्रति निर्माण झालेली आवड शमवण्याचे काम सुरू होते. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण हे कला शाखेतून मालवण तालुयातील स. का. पाटील महाविद्यालयात झाले.

मालवण तालुका म्हणजे पर्यटनाचे केंद्रबिंदू. परिणामी, दर्शनचा ओढाही पर्यटन क्षेत्राकडे वळला. घरातल्या प्रत्येकाने आपआपला चरितार्थ आपण स्वतः चालवावा, असा घराण्याचा दंडक होता. त्यामुळे नोकरीसाठी बाहेर गावी न जाता, मालवणमध्येच पर्यटनावर आधारित व्यवसाय करायचे त्याने ठरवले. त्यासाठी लागणारी सर्व मेहनत स्वतः केली. मात्र, त्याने निसर्गाची साथ सोडली नाही. ‘कोविड’मधील ‘लॉकडाऊन’च्या वेळेस खर्या अर्थाने त्याला निसर्गाची वाट दिसली. या काळात त्याने आसपासचा परिसर पिंजून काढला. यापूर्वी आसपास दिसणार्या प्राण्यांचे छायाचित्र टिपून त्यांची ओळख पटवण्याचे कोणतेच साधन त्याच्यापाशी नव्हते. त्यामुळे त्या प्राण्याची ओळख पटवणे, त्याविषयी मार्गदर्शन घेणे शय होत नव्हते. कोण्या तज्ज्ञाला प्राण्याच्या वर्तनाची तोंडी माहिती सांगून त्याच्याकडून माहिती मिळवणे कठीण व्हायचे. मात्र, ‘लॉकडाऊन’च्या काळात हाती मोबाईलदेखील होता आणि सोबतीला मानवी वावर नसलेला निसर्गही! त्यामुळे आसपास दिसणार्या प्राण्यांची छायाचित्रे टिपून ते तज्ज्ञांना पाठवून त्यांची ओळख पटवून आपल्या ज्ञानात भर घालून घेतली.

सध्या दर्शन मालवणमध्येच ‘आंग्रिया होम-स्टे’ नावाचा आपला एक होम-स्टे चालवतो. पर्यटक हर प्रकारचे असतात. कुठला पर्यटक कशासाठी येतो, हे दर्शन पहिल्याच भेटीत सांगू शकतो. मालवण फिरायला येणारे पर्यटक हे निसर्ग जाणणारे असायला हवेत. त्यांना इथल्या निसर्गाची काळजी हवी, असा त्याचे मत. त्यामुळे ‘आंग्रिया’मध्ये येणारे पर्यटक याच धाटणीचे निवडक असतात. दर्शनने ‘इको-टुरिझम’मध्ये डिप्लोमा केला असून, तो ‘नेचर गाईड’ म्हणूनही काम करतो. केवळ समुद्र म्हणजे मालवण किंवा आमचा सिंधुदुर्ग नाही, असे समजून सध्या तो पूर्ण सिंधुदुर्ग पालथा घालत आहे. त्या माध्यमातून त्याने सिंधुदुर्गातील जंगलातील वाघाची दुर्मीळ छबीदेखील टिपली. इथल्या प्राण्यांच्या सवयी, त्यांचे अधिवास शोधणे, त्यांचा अभ्यास करणे, जखमी प्राण्यांवर पक्ष्यांवर उपचार करणे, असे काम तो सध्या करतो.

सिंधुदुर्गात खासगी मालकीची जंगले आहेत. त्यात ‘कोकणचा विकास’ या संकल्पनेअंतर्गत खासगी मालकीचे जंगल कापून काजू-आंबे लागवडीचा पेव फुटला आहे. त्यामुळे २०२३ साली त्याने स्थापना केलेल्या ’युथ बिट्स फॉर लायमेट’ या संस्थेच्या माध्यमातून तो याविषयी जनजागृतीचे काम करत आहे. शाळांमध्ये जाऊन हवामान बदल, प्लास्टिक प्रदूषण यांवर आधारित जनजागृतीचे कार्यक्रम राबवत आहे. याशिवाय ’वाईल्डलाईफ रेस्यूअर सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या माध्यमातून तालुयातील वन्यजीवांचे बचावकार्य करण्याचे काम करत आहे. या माध्यमातून खवले मांजरासारख्या दुर्मीळ जीवांचे प्राणही वाचविण्यात आले आहे. २०१७ ते २०२२ या काळात त्याने ’डशिलळरश्र एुशर्लीींर्ळींश जषषळलशी’ (डएज) म्हणूनही काम केले. ’तारकर्ली पर्यटन विकास संस्थे’चा सचिव म्हणूनही तो कार्यरत आहे.

मालवणला पर्यटकांची कमी नाही. असे असताना, निसर्गाच्या जीवावरच पैसा मिळत असल्याने, ते पर्यटन निसर्गपूरक असावे, असा दर्शनचा आग्रह. दर्शनाच्या कामामध्ये त्याला ‘कोकण पर्यटन महासंघ’, ‘वाईल्डलाईफ रेस्युअर’, ‘मालवण वाईल्ड केअर’, ‘युथ बिट्स फॉर लायमेट’, ‘इकोमेट्स’ अशा कोकणासाठी सतत धडपड करणार्या संस्थांचा सहकार्य मिळते. स्वप्निल गोसावी, संजय परुळेकर, अक्षय रेवडकर यांसारख्या समविचारी मित्रांची साथ आणि वनविभागातील अधिकार्यांचे मार्गदर्शनही लाभल्याचे दर्शन सांगतो. पर्यटन आणि निसर्ग यांची सांगड घालून वाटचाल करणार्या दर्शनला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

(Eggs Thrown At ISKCON Rath Yatra In Toronto Canada) कॅनडाच्या टोरंटोमध्ये काढलेल्या इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्या महिलेने केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121