नव्या पिढीने आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा विचार करत जीवन जगण्याची दिशा ठरवायला हवी. सात्विक आहार स्वीकारणं, कृत्रिम जीवनशैलीपासून दूर राहणं, देशी पर्यटनातून भारताची संस्कृती समजून घेणं आणि वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचं रक्षण करणं हे जीवन समृद्ध करणारे मूलमंत्र आहेत, असे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव व संसाधन) सुचिता भिकाने यांनी केले.
Read More
२८८.१७ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
सिंधुदुर्गची जैवविविधता चोखंदळपणे टिपून त्याआधारे पर्यटनाची सांगड घालणार्या दर्शन प्रदीप वेंगुर्लेकर याच्याविषयी...
कोणत्याही देशाच्या विकासाचा सर्वांगीण प्रसार होणे फार महत्त्वाचे. भारताच्या भूगोलामध्ये केंद्रशासित प्रदेशांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. अंदमान-निकोबारसारखी द्वीप तर बहुउद्देशीय म्हणावे लागतील. अशा बेटांचे महत्त्व जसे सीमा संरक्षणात आहे, तसेच देशाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेच्या वाढीतही आहे. अशाच देशातील केंद्रशासित प्रदेश आणि द्वीपांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या निरनिराळ्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या एका विशेष ट्रेनने पहिल्या यात्रेचा प्रारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झ्हातृप्ती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सोमवार, दि.९ रोजी हिरवा झेंडा दाखवत या प्रवासाचा शुभारमाभ केला. याप्रसंगी बोलताना,"छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल" असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर व्याघ्र पर्यटनाच्या संधी आणि त्याचे स्वरुप कशा पद्धतीचे असावे, याविषयी विवेचन करणारा हा लेख...
सिंधुदुर्गात केंद्रित असणार्या किनारी पर्यटनाचा कल आता वनपर्यटनाच्या दृष्टीने वळू लागला आहे. या नव्या ट्रेंडमुळेदेखील जिल्ह्यातील तरुण स्थानिकांना उपजीविकेच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याच बदलत्या ट्रेंडविषयी...
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत भारताच्या पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली.
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra #maharashtra_desha #ganpatibappamorya #ganpatibappa #bappamorya #ganpati #ganapati #bappa #morya #ganesh #mum_ganpati #bappa_maza #ganpati_bappa_morya #ganpativisarjan #siddhivinayak #siddhivinayaktemple #siddhivinayakmandir #siddhivinayakonline
महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेत ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
माळशेज घाटातील स्कायवॉकचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ठिकाणचे पर्यटन दृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिले.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आणि बच्चेकंपनीला सुटी लागली की, अनेक पालकांना पर्यटन आणि भ्रमंती खुणावते. नोकरदारवर्गासोबतच तरुणाईलाही भटकंतीचे वेध लागतात. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांतील पर्यटन व्यवसायातील बदलत्या ट्रेंड्सचे आकलन करणारा हा लेख...
( The responsibility of constructing the Shiv Smarak in Agra falls to the Tourism Department Devendra Fadanvis ) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीदिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वित आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत देत राज्याच्या विकासाला आपली पसंती दर्शविली. हे पाहता केंद्र सरकारकडून राज्यभरात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ आगामी काळात रोवली जाणार आहे. आठवडाभरात कोट्यवधींचे रेल्वे आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले आहे.
अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
केरळच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पहिल्या सी प्लेनचे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे. कोचीच्या बोलगट्टी मरिना येथून सी प्लेनने उड्डाण केले आणि इडुक्की येथील मट्टुपेट्टी धरणावर सहज उतरले. केरळचे पर्यटन सचिव के बिजू, विमान वाहतूक सचिव बिजू प्रभाकर, जिल्हाधिकारी एन एस के उमेश आणि इतर पर्यटन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी १७ आसनी विमानाचे यशस्वी उड्डाणानंतर आगमन होताच स्वागत केले.
'एक्सेल लंडन’ येथील जागतिक पर्यटन बाजारमध्ये भारत सहभागी होणार आहे. दि. ०५ ते ०७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार आहे. भारत सहभाग नोंदविताना पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
(Ajanta Caves) महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांना विनाअडथळा अजिंठा लेणीपर्यंत नेण्यासाठी २० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सुरू केला आहे, अशी माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली.
(Karde)महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी
देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा अजूनही मागे आहे. जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे ४७.८ लाख परदेशी पर्यटक देशात आले, अशी माहिती पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत सर्वाधिक पर्यटक बांगलादेश आणि अमेरिकेतून आले आहेत.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मराठीतील प्रसिद्ध प्रवासवर्णनपर पुस्तकांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
देशांतर्गत पर्यटनवाढीसाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या आगमनात मोठी वाढ दिसून आली आहे.
राज्याच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते मात्र या पुढे राज्यातील पर्यटन विभागाला एकच महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह (लोगो) व महाराष्ट्र अनलिमिटेड ( टॅग लाईन) असे घोषवाक्य असणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी पार पडले. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जगभरात ख्याती असणारी आणि भारतीय संस्कृतीत पौराणिक महत्व असणारी देवभूमी म्हणून ओळख असलेली उत्तराखंड नगरी होय. हे पाहता आयरसीटीसीने उत्तराखंड टुरिझमच्या सहकार्याने उत्तराखंडमधील विविध पर्यटन स्थळांसाठी आध्यात्मिक प्रवासाची मालिका सुरू केली आहे. या मालिकेत अविश्वसनीय शांत मंदिरे आणि नयनरम्य लँडस्केप्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला उत्तम प्रतिसाद आहे. मात्र पावसाळा सुरु होणार असल्याने या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
चंड वाढलेली महागाई, वीजटंचाई आदी मागण्यांसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज जम्मू-काश्मीरकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण स्वर्ग म्हणून पाहतो, परंतु पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत असे म्हटल्याचे कधी समोर आले नाही. पाकव्याप्त काश्मीरसुद्धा तितकाच निसर्गसौंदर्याने नटलेला भूभाग.
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
'कांदळवन कक्ष' आणि 'कांदळवन प्रतिष्ठाना'कडून रत्नागिरीतील नाचणे आणि पावस गावामध्ये कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे (pawas nachane mangrove) . मंगळवारी या प्रकल्पाचे लोकापर्ण करण्यात आले (pawas nachane mangrove). यामाध्यमातून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कांदळवन सफारी, पक्षीनिरीक्षण आणि कयाकिंग करता येणार आहे. (pawas nachane mangrove)
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर निसर्गसौंदर्यतेने नटलेले गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. कोकणातील जुनी मंदिरे आणि विशाल समुद्रकिनारे पाहण्यसाठी पर्यटक हमखास गणपतीपुळेला पहिली पसंती देत आहे. गणपतीपुळेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाल्याने पर्यटकांचा ओघ अजूनच वाढू लागला आहे. कोकणातील मंदिर स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणाऱ्या गणपतीपुळेला आता वाढत्या पर्यटनामुळे नवी ओळख मिळाल्याची माहिती गणपतीपुळे येथील ‘वेस्ट बे रिसॉर्ट एन्ड स्पा’ रिसॉर्टचे संचालक चैतन्य तेंडुलकर यांनी दिली आहे.
प्रवास मनुष्याला समृद्ध बनवतो. या प्रवासाची वर्णनेही अगदी अनादिकालापासून मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. आपला प्रांत सोडून जाऊ न शकणार्यांना ही प्रवासवर्णने दृष्टी देतात. परंतु, अजूनही हा साहित्यप्रकार मुख्य प्रवाहात म्हणावा तेवढा रुळलेला दिसत नाही. नुकताच ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न झाला. तेव्हा, प्रवासाचे आणि साहित्याचे नेमके नाते काय, हे उलगडून सांगणार्या पर्यटनाशी संबंधित काही लेखकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया...
केंद्र सरकार लक्षद्वीपच्या विकासासाठी ₹३६०० कोटींहून अधिक खर्च करणार आहे. वास्तविक, केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या बेटांवर विविध प्रकारच्या सुविधा विकसित करणार आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना परदेशात न जाता आपल्या देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटता येणार आहे. केंद्र सरकार लक्षद्वीपला पर्यटन केंद्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘इंडिया आऊट’ अशी मोहीम राबवत, मालदीवमध्ये सत्तेवर आलेल्या मोहम्मद मोइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीयांची माफी मागावी, असे आवाहन तेथील विरोधी पक्षनेत्यांनी केले. तसेच मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जात असून, महाभियोग चालविला जाईल. त्यामुळे भारताविरोधी मुजोरी आणि चीनच्या अंधसमर्थनातून सुरु झालेले हे प्रकरण आता थेट मोइज्जूंच्या महाभियोगापर्यंत येऊन ठेपलेले दिसते.
ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिव्हल २०२४ च्या समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही पर्यटन मंत्री महाजन यांनी केले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी १४ जानेवारीला अयोध्येत पर्यटनाशी संबंधी मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. या App मुळे राममंदारात य़ेणाऱ्या भाविकांसाठी आहे. या अॅपला 'होली अयोध्या' असे नाव देण्यात आले आहे.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा समाविष्ट असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतीयांनी मालदीवला चांगलाच झटका दिला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांवर आणि नस्लभेदी टिप्पणी करणाऱ्या लोकांवर सडकून टीका केली आहे. बॉलिवूड कलाकारांनी भारतीय समुद्र किनाऱ्यांचे फोटो शेयर करत, येथे भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
इस्रायल-‘हमास’संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदेशी पर्यटक भारताकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. २०२४ पर्यंत देशात १.३३ कोटी पर्यटक येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ऑक्टोबरपासून पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, तसेच दिवाळीसारखा सण यामुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक झाली, असे मानले जाते. त्याविषयी...
सातारा जिल्ह्यातील किरकसाल या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गावामध्ये आता निसर्ग पर्यटनाची ( kiraksal ) सुरूवात होत आहे. पुण्या-मुंबईतील पर्यटकांना किरकसालची (kiraksal) जैवविविधता पाहता यावी तसेच स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीकोनातून निसर्ग पर्यटनाची सुरूवात करण्यात आली आहे. (kiraksal)
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडल्यामुळे आता राज्यामध्ये पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तब्बल १.८८ कोटी पर्यटकांनी काश्मीरला २०२२ मध्ये भेट दिल्याची आकडेवारी समोर आली असून, विशेष म्हणजे हा गेल्या ७५ वर्षांतला सर्वात मोठा विक्रम म्हणावा लागेल. त्यानिमित्ताने केंद्र सरकार, सैन्यदलातर्फे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन विकासासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि याबाबतीत उपलब्ध असलेल्या अनेकानेक संधी यांचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून कार्यान्वित झाले आहे. तसेच खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरंटही पूर्णतः महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल व्यासपीठाने आज एम्बेडेड संरक्षणासाठी इन्शुअरटेक कव्हर जिनियससोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. कव्हर जिनियसचे पुरस्कार-प्राप्त जागतिक वितरण व्यासपीठ एक्सकव्हरला समाविष्ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्यांची तिकिटे बुक करताना कॅन्सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्हल प्रोटेक्शनसह एम्बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्हल प्रोटेक्शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्सकव्हरच्या एण्ड-टू-एण्ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्या सेलपासून व
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस् प्रदान करत पर्यटकांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहे.
गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत २१ सप्टेंबर, २०२३ रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी ग्लास स्कायवॉक उभारण्यात यावा आणि मावळ तालुक्यातील कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून या अर्जप्रक्रियेस मुदत वाढ देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.