'बांगलादेशी घुसखोर चले जाव ! ' च्या घोषणेत मनसेच्या मोर्चाला सुरवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2020
Total Views |


MNS_1  H x W: 0


मुंबई : महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेने आले आहेत. या मोर्चाला सुरूवात झाली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे अखेर हिंदू जिमखाना येथून आझाद मैदानाकडे रवाना होत आहे. मोर्चाला येण्यापूर्वी ठाकरे यांनी सपत्नीक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुसरीकडे हिंदू जिमखाना परिसर हा भगव्या रंगाने फुलून गेला आहे. अनेक प्रमुख नेते , कलाकार व राज ठाकरे कुटुंबीयांनी या मोर्चात सहभाग नोंदविला. 



राज ठाकरे काय बोलणार
?

सीएए आणि एनआरसीवरून देशात गोंधळ सुरु असताना निघालेला असताना राज ठाकरे यांनी प्रथमच घुसखोरांविरूद्ध भूमिका मांडली. या घुसखोरांना बाहेर काढण्यात यावं, असं ते म्हणाले होत. त्यावरून सीएएला मनसेचं समर्थन असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरही त्यांनी खुलासा केला. बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला, असं आपण म्हणालो होतो. सीएएचं समर्थन केलं नाही. आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला,” असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावर राज ठाकरे आज काही बोलणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

@@AUTHORINFO_V1@@