कोरोनाचा कहर (भाग-२८) - ‘कोरोना’ आणि होमियोपॅथी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |

corona and homiopathy _1&


प्रश्न हा आहे की, होमियोपॅथीचे उपचार व त्यांचा प्रभावीपणा हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही. इतर औषधांच्या ‘साईड इफेक्ट्स’मुळे अनेकांचे जीव जात असले, तरी चालेल, पण होमियोपॅथीला कोरोना उपचारामध्ये पुढे येऊ दिले जात नाही.


कोरोनाच्या या प्रकोपामुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था तर कोलमडलीच, पण कित्येक लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ढासळले. कोरोनाच्या या महामारीला रोखण्यासाठी होमियोपॅथीमध्ये अनेक औषधे आहेत आणि आम्ही याच औषधांच्या आधारे कित्येक कोरोनाबाधित रुग्णांना अतिशय प्रभावीपणे व माफक दरात बरेदेखील केले आहे. प्रश्न हा आहे की, होमियोपॅथीचे उपचार व त्यांचा प्रभावीपणा हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही. इतर औषधांच्या ‘साईड इफेक्ट्स’मुळे अनेकांचे जीव जात असले, तरी चालेल, पण होमियोपॅथीला कोरोना उपचारामध्ये पुढे येऊ दिले जात नाही.



होमियोपॅथीच्या उपचारांमुळे कोरोना बरा कसा होणार? किंवा होमियोपॅथीमुळे बरे व्हायला वेळ लागतो हे सर्व गैरसमज आहेत व त्याबद्दल आपण पूर्वीदेखील विस्ताराने माहिती घेतली आहे. होमियोपॅथीच्या उपचारांनी रुग्णाला रुग्णालयात ठेवण्याचीदेखील गरज पडत नाही, इतक्या लवकर तो या ‘कोविड’च्या आजारातून बरा होतो. जर नीट विचार केला, तर आपण व्हायरल फिव्हरसाठी औषधं घेताल्यामुळे ताप तीन ते चार दिवसांत निघून जातो, त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग हादेखील एक व्हायरल फिव्हर आहे. फरक इतकाच की, हा ताप एकामुळे दुसर्‍याला होतो व त्याचा परिणाम हा माणसाच्या फुप्फुसांवर होत असतो. श्वसनक्रियेवर परिणामकारकरित्या काम करणारी होमियोपॅथीची औषधे जर आपण घेतली, तर कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजनची पातळीसुद्धा वर येते व तापसुद्धा लवकर उतरतो, याचबरोबर न्यूमोनियासह जी लक्षणे छातीमध्ये दिसतात, तीसुद्धा अतिशय लवकर निघून जातात. होमियोपॅथीच्या उपचारांमुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती चांगल्याप्रकारे वाढीला लागते व तो या ‘कोविड’च्या आजाराला समर्थपणे तोंड देऊ शकतो. कारण, इतर औषधांनी रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती ही वाढवण्याऐवजी अजूनच खालावते व त्याला आजार होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, कोरोनावर ज्याप्रकारे अ‍ॅलोपॅथी पद्धतीने उपचार केले जात आहेत, त्याप्रमाणे होमियोपॅथीनेही उपचार व्हायला हवेत... पण त्यासाठी सरकार हे उदासीन आहे व सरकारकडूनच पाठिंबा मिळत नाही.



सरकारकडून याबद्दल संशोधनासाठी व उपचारांसाठी व्यासपीठच उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडूनही यावर उदासीनता दिसते आहे, हे रुग्णांचे दुर्दैव आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ म्हणजेच ‘आयसीएमआर’या संस्थेकडून कोरोनासाठी होमियोपॅथीला परवानगी नाकारण्यात येत आहे, मुळात ‘आयसीएमआर’ ही संस्था अ‍ॅलोपॅथीच्या औषधांवर काम करणारी संस्था आहे व केवळ एका औषधशास्त्राचे प्रभुत्व ठेवण्यासाठी व औषध कंपन्यांच्या दबावामुळे हे लोक होमियोपॅथीला वाव देत नाहीत. परंतु, ‘कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही,’ त्याप्रमाणे कोविडच्या रुग्णांवर होमियोपॅथी प्रभावी आहे, हे आता सर्वांना कळायला लागले आहे. पुढील भागात आपण या कोविडला कसे रोखायचे ते पाहूया.


- डॉ. मंदार पाटकर


@@AUTHORINFO_V1@@