व्हॉटस्अॅपद्वारेही करता येणार पैसे ट्रान्सफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : व्हॉटस्अॅप अध्यक्ष विल कॅथकार्ट यांनी भारतात वर्षअखेरीस पेमेंट सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कॅथकार्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. व्हॉटस्अॅपतर्फे पेमेंट सेवा अतिशय सुलभ करण्याचा विचार केला जात आहे. गेल्या वर्षीपासून व्हॉटस्अॅप १० लाख ग्राहकांना सोबत घेऊन पेमेंट सर्व्हीसेसचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरू करत आहे. सध्या देशभरात एकूण ४० कोटी व्हॉटस्अॅपचे वापरकर्ते आहेत.

 

व्हॉटस्अॅप पेमेंट सेवा सुरक्षित नसल्याचा आरोप

 

व्हॉटस्अॅप पेमेंटची स्पर्धा थेट भारतातील सध्याच्या पेटीएम, गुगल तेज, फोन पे आदी कंपन्यांशी असणार आहे. भारतातील बाजारपेठेशिवाय इतर देशांमधील १५० कोटी युझर्सना सेवा देण्याचा निर्णय व्हॉटस्अॅपतर्फे घेण्यात आला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी व्हॉटस्अॅप पेमेंट अॅप सुरक्षित नसल्याचा आरोप केला आहे.

 

भारतात सेवा देण्यासाठी ही अडचण

व्हॉटस्अॅपला भारतात पेमेंट सुरू करण्यासाठी ऑथेंटीकेशन करण्याची गरज आहे. भारतात सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांचा डेटा लोकल सर्व्हरमध्ये साठवण्याची अट भारत सरकारतर्फे घालण्यात आली आहे. त्यातच व्हॉटस्अॅपच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावरून व्हॉटस्अॅपला घेरले आहे. आरबीआयच्या नियमावलींचे पालन केल्यानंतरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@